केंद्राचा मोठा निर्णय; विदेशी लसींच्या ट्रायलला स्थगिती

लसींच्या आयातीसाठी फायझरसारख्या कंपनीशीही चर्चा सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे. या व्यतिरिक्त जॉन्सन अँड जॉन्सन आणि मॉडर्ना यांच्याशीही चर्चा झाली आहे.
vaccination
vaccinationFile photo
Updated on
Summary

लसींच्या आयातीसाठी फायझरसारख्या कंपनीशीही चर्चा सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे. या व्यतिरिक्त जॉन्सन अँड जॉन्सन आणि मॉडर्ना यांच्याशीही चर्चा झाली आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दलही तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सध्या लसीकरण (Vaccination) आणि कोरोना नियमांचे पालन करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरणाकडे मोर्चा वळवला आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी भारत सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. (India scraps local trials for Covid-19 shots to fast-track imports as it battles second wave)

कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने अनेक देशांकडे लसींसाठी मागणी केली. त्यानंतर रशियासारख्या देशांनी मदतीचा हात पुढे केला. नामांकित परदेशी लसींवरील सुरू असलेली लोकल ट्रायल (स्थानिक चाचणी) अचानक थांबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता थेट परदेशातून लसी आयात करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये दररोज दोन लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण होत आहे, तसेच अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भारतात सध्या अॅस्ट्राजेनका, कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या लस नागरिकांना दिल्या जात आहेत. रशियाचा स्पुतनिक-व्हीलाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे. रशियातून काही लाख लस भारतात दाखल झाल्या असून काही दिवसांत भारतात त्याचे उत्पादन घेतले जाणार आहे.

vaccination
ESakal Survey : मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती कशी हाताळली?

तसेच लसींच्या आयातीसाठी फायझरसारख्या कंपनीशीही चर्चा सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे. या व्यतिरिक्त जॉन्सन अँड जॉन्सन आणि मॉडर्ना यांच्याशीही चर्चा झाली आहे. गेल्या महिन्यात भारत सरकारने परदेशी लसींना झटपट मंजुरी देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु लोकल ट्रायलवर जोर दिल्यामुळे फाइझरशी बोलणी थांबली होती. सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, "परदेशांमध्ये उत्पादित केलेल्या चांगल्या लसींसाठी लोकल ट्रायल अनिवार्य करण्यात आली होती. पण आता नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे."

vaccination
तीन कारणांमुळे होतो म्युकरमायकोसिस; तज्ज्ञांनी केला उलगडा

सरकारने असेही म्हटले आहे की, वॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या एकाही कंपनीने भारताच्या औषध नियामकांकडे मंजुरीसाठी अर्ज केलेला नाही. आंतरराष्ट्रीय लस उत्पादकांनी भारतात येऊन लस तयार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. देशात २० कोटींहून अधिक जणांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. पण फक्त ३ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com