

Ladakh Donation Drive Iran
Sakal
India Extends Humanitarian Support to Iran : अमेरिका-इस्रायल युती आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील विविध भागांतील लोक इराणी नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या रोख रकमा, सोने, दागिने आणि इतर वस्तूंच्या स्वरूपात देणग्या जमा होत आहेत. मात्र या दरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एक घटना लेह जिल्ह्यात घडली आहे. एका अंडे लिलावात तब्बल २५००० रुपयांना विकले गेले आहे. ते अंडे इराणला मदत व्हावी म्हणून एका स्थानिक रहिवाशाने विकत घेतले आहे.