ब्रह्मोस मिसाईलचे यशस्वी परिक्षण; पाक-चीन सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचं मोठं यश

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

एका कराराअंतर्गत फिलीपाईन्स भारताकडून ब्रह्मोस हे मिसाईल खरेदी करणार आहे.

नवी दिल्ली : भारताने आपल्या सुपरसोनिक क्रूज मिसाईल ब्रह्मोसच्या लँड अटॅक व्हर्जनचे आज यशस्वी परिक्षण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सेनेने मंगळवारी अंदमान आणि निकोबार द्वीपवर या क्रूज मिसाईलचे यशस्वी परिक्षण केले आहे. भारताने आज अंदमान आणि निकोबार द्वीप समूहावरुन ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईलच्या लँड अटॅक व्हर्जनचे परिक्षण केले आहे. ब्रह्मोस मिसाईलने तिथल्याच इतर एका द्वीपवर निशाणा साधला होता. 

हेही वाचा - सनकी फॅन; नितीश कुमार चौथ्यांदा CM झाल्यावर समर्थकाने कापले आपले चौथे बोट

याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. या सुपरसोनिक क्रूज मिसाईलचे परिक्षण सकाळी दहा वाजता करण्यात आले. मिसाईलने यशस्वीरित्या आपल्या लक्ष्यावर निशाणा साधला. हे परिक्षण भारतीय सैन्याने केले आहे.

सैन्यामध्ये डीआरडीओच्या वतीने विकसित मिसाईल प्रणालीच्या अनेक रेजिमेंट सहभागी आहेत. ब्रह्मोस मिसाईलची स्ट्राईक रेंज आता 400 किलोमीटरपेक्षा जास्त वाढवली गेली आहे. चीन आणि पाकिस्तानसोबत वास्तविक नियंत्रण रेषेवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे यश हे महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. 

हेही वाचा - 5 स्टार हॉटेलमधून पार्सल मागवून शहा आदिवासी कुटुंबियांसोबत जेवले, ममता बॅनर्जींचा दावा

ब्रह्मोस मिसाईलची भारत करणार निर्यात
एका कराराअंतर्गत फिलीपाईन्स भारताकडून ब्रह्मोस हे मिसाईल खरेदी करणार आहे. ब्रह्मोस हे भारतीय बनावटीचे स्वदेशी मिसाईल आहे. या मिसाईलची निर्मिती भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी मिळून केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि रशियाची संयुक्त अशी टीम जी या मिसाईलची निर्मिती करते ती लवकरत फिलीपाईन्सच्या सेनेला ब्रह्मोस मिसाईल देण्याचा करार करेल. डिसेंबर महिन्यात मनीला दौऱ्यात हा करार करण्यात येणार आहे. मनीला दौऱ्यात ही टीम या कराराबाबतच्या बाबी ठरवेल. भारत आणि फिलीपाईन्सच्या दरम्यान इतर अनेक मुद्यांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. 6 नोव्हेंबर रोजी भारत आणि फिलीपाईन्सच्या दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाची व्हर्च्यूअल मिटींग झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India testfired land attack version of the BrahMos supersonic cruise missile Andaman and Nicobar