दीड कोटी पार्किंग फी भरा, नाहीतर विमान जप्त करू

बांगलादेशी कंपनीला भारताकडून अखेरची संधी
United Airways Bangladesh
United Airways Bangladesh ANI

नवी दिल्ली : पार्किंगचे पैसे थकल्याने बांगलादेशमधील युनायटेड एअरवेज कंपनीचे विमान जप्त करण्याची कारवाई लवकरच सुरु केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे विमान रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर उभे आहे.

याबाबत माहिती देताना रायपूर विमानतळाचे संचालक राकेश सहाय यांनी सांगितले की, ‘‘थकीत रक्कम भरून विमान कंपनीने त्यांचे विमान विमानतळावरून हलवावे, यासाठी त्यांना अखेरची संधी देण्यात आली आहे. विमानतळावर पार्किंग करण्याचे आणि इतर तांत्रिक दुरुस्तीचे मिळून दीड कोटी रुपये युनायटेड एअरवेजकडून येणे बाकी आहे. या कंपनीने लवकरात लवकर ही रक्कम न दिल्यास कायदेशीर कारवाईसाठी आम्ही भारतीय विमानतळ प्राधिकरणाशी संपर्क साधणार आहोत.’’

United Airways Bangladesh
लॉकडाउनचा निर्णय राज्यांनी घ्यावा; केंद्राची भूमिका

सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, युनायटेड एअरवेजचे एमडी-८३ या विमानाने ७ ऑगस्ट २०१५ ला मस्कत येथे जाण्यासाठी ढाक्याहून उड्डाण केले होते. या विमानात १७३ प्रवासी होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इंजिनमध्ये आग लागल्याने विमान आपत्कालीन परिस्थितीत रायपूर विमानतळावर उतरविण्यात आले होते. तेव्हापासून हे विमान याच विमानतळावर असून विमान कंपनीने ते परत नेण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.

United Airways Bangladesh
लॉकडाऊनच्या घोषणेनंतर दारुच्या दुकानाबाहेर रांगा; तळीरामांची मोठी गर्दी

गेल्या सहा वर्षांपासून युनायटेड एअरवेजबरोबर सातत्याने संपर्क साधून विमान घेऊन जाण्यास सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी या कंपनीने, नऊ महिन्यांत विमान विकून सर्व शुल्क भरण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, ही मुदतही संपली आहे. आता विमानतळ अधिकाऱ्यांनी या कंपनीला अखेरची संधी दिली असून थकीत रक्कम भरून विमान लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. ही बाब परराष्ट्र मंत्रालयाकडेही उपस्थित करण्यात आली आहे. त्यामुळे त्या पातळीवरूनही हालचाल होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com