Piyush Goyal on India-US Trade Deal: भारताच्या इतिहासात 'हा' दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल - पियूष गोयल

Piyush Goyal Press : जाणून घ्या, भारत-अमेरिका व्यापार करारानंतर आता कोणत्या वस्तूंवर असणार शून्य टॅरिफ?
Union Minister Piyush Goyal addressing the media on the historic India–US trade agreement

Union Minister Piyush Goyal addressing the media on the historic India–US trade agreement

esakal

Updated on

India–US Trade Agreement Marks a Historic Milestone : भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कारास शुक्रवारी रात्री उशीरा अंतिम रूप देण्यात आले. संयुक्त निवेदन जगासमोर सादर करण्यात आले आणि त्याचे व्यापक स्वागत करण्यात आले.

तर भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार करारानंतर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी दोन्ही देशांच्या हितासाठी हा एक मोठा करार असल्याचे वर्णन केले. तसेच गोयल म्हणाले की, हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.

यावेळी पियूष गोयल म्हणाले की,  हिरे, औषधी, कॉफी, आंबा आणि इतर अनेक वस्तू अमेरिकेला शुल्कमुक्त निर्यात केल्या जातील. अनेक भारतीय कृषी उत्पादने आता शुल्काशिवाय अमेरिकेला निर्यात करता येतील. यामध्ये चहा, मसाले, नारळ तेल, वनस्पती मेण, सुपारी, ब्राझील नट्स आणि विविध फळे आणि भाज्यांचा समावेश आहे.

Union Minister Piyush Goyal addressing the media on the historic India–US trade agreement
DK Shivakumar Latest News : डीके शिवकुमार मुख्यमंत्री कधी? सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण, म्हणाले...

तसेच पियूष गोयल यांच्या मते, भाज्यांची मुळे, धान्ये, बार्ली, बेकरी उत्पादने, कोको उत्पादने, तीळ, खसखस ​​आणि लिंबूवर्गीय रस यांनाही परस्पर शुल्कातून सूट देण्यात येईल आणि आता ते अमेरिकन बाजारात शुल्कमुक्त असतील.

Union Minister Piyush Goyal addressing the media on the historic India–US trade agreement
Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

याचबरोबर मंत्री पियूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, अमेरिकेने चीनवर ३५ टक्के आणि बांगलादेशवर २० टक्के कर लादला आहे, तर भारतावर केवळ १८ टक्के कर लादला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com