Russia-Ukraine war : भारताने प्रथमच केले रशियाविरोधात मतदान; मैत्री तुटणार?

भारताच्या भूमिकेमुळे अमेरिकेसह पाश्चिमात्य देश नाराज आहेत
Russia-Ukraine war Latest News
Russia-Ukraine war Latest NewsRussia-Ukraine war Latest News

Russia-Ukraine war Latest News नवी दिल्ली : युक्रेन युद्धानंतर भारताने प्रथमच रशियाच्या विरोधात मतदान केले आहे. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमध्ये (UNSC) युक्रेनवरील प्रक्रियात्मक मतदान दरम्यान भारताने (India) प्रथमच रशियाच्या विरोधात मतदान केले. युक्रेनमध्ये रशियाचे (Russia) सहा महिन्यांहून अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. युद्धानंतर संयुक्त राष्ट्रांनी रशियाच्या विरोधात अनेकदा मतदान केले आहे. मात्र, भारताने रशियाविरोधात मतदानात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

१५ सदस्यीय सुरक्षा परिषदेने युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमर झेलेंस्की यांना व्हिडिओ-टेलिकॉन्फरन्सद्वारे बैठकीला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले होते. फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. त्यानंतर भारताने प्रथमच रशियाच्या विरोधात मतदान केले आहे. आतापर्यंत भारत युक्रेनचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत टाळत आला होता.

Russia-Ukraine war Latest News
Three Diseases : एकाचवेळी मंकीपॉक्स, कोरोना, एचआयव्हीची लागण; जगातील पहिले प्रकरण

भारताच्या (India) या भूमिकेमुळे अमेरिकेसह पाश्चिमात्य देश नाराज आहेत. युक्रेनवरील हल्ल्यानंतर पाश्चात्त्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक आणि इतर निर्बंध लादले आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा भारताने निषेध केलेला नाही. नवी दिल्लीने रशिया (Russia) आणि युक्रेनला मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या मार्गावर परत येण्याचे वारंवार आवाहन केले आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष संपवण्यासाठी सर्व राजनैतिक प्रयत्नांमध्ये सहकार्य व्यक्त केले आहे.

भारत दोन वर्षांसाठी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलचा कायमस्वरूपी सदस्य आहे. कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपणार आहे. युक्रेनच्या (Ukraine) स्वातंत्र्याच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त सुरक्षा परिषदेने बुधवारी सहा महिने चाललेल्या युद्धाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

Russia-Ukraine war Latest News
The Kapil Sharma Show Promo : अर्चना म्हणाली, बायको आठवत नाही अन्...

बैठक सुरू होताच संयुक्त राष्ट्रातील रशियाचे राजदूत वसिली ए. नेबेन्झिया यांनी व्हिडिओ टेलि-कॉन्फरन्सद्वारे झेलेंस्कीच्या बैठकीत सहभागाबाबत प्रक्रियात्मक मताची विनंती केली. यानंतर १३ सदस्यांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. रशियाने या आमंत्रणाच्या विरोधात मतदान केले आणि चीनने मतदान केले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com