भारताने पाकिस्तानला सुनावले; कठोर कारवाई करा

पीटीआय
सोमवार, 6 जानेवारी 2020

पाकिस्तानातील पेशावर शहरात शीख समुदायावर झालेल्या हल्ल्याचा भारताने कठोर शब्दांत निषेध केला आहे. पाकिस्तानने चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांना रोखण्याबरोबरच अशा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांना कठोर शासन करण्यासाठी तातडीने कारवाई करावी, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानातील पेशावर शहरात शीख समुदायावर झालेल्या हल्ल्याचा भारताने कठोर शब्दांत निषेध केला आहे. पाकिस्तानने चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांना रोखण्याबरोबरच अशा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांना कठोर शासन करण्यासाठी तातडीने कारवाई करावी, असे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘पेशावरमध्ये शीख समुदायाला लक्ष्य करून हल्ला करण्यात आला, यामध्ये एका व्यक्तीला ठार मारण्यात आल्याच्या घटनेचा भारत कठोर शब्दांत निषेध करतो. याआधीही नानकाना साहिब येथील गुरुद्वाराची मोडतोड करण्यात आली होती. जगजितकौर या शीख तरुणीचे काही मंडळींनी अपहरण करून तिच्याशी विवाह करत तिचे जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणले होते. या घटनेचाही तपास पूर्ण झालेला नाही,’’ असे परराष्ट्रमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. 

नानकाना साहिब संपूर्णपणे सुरक्षित; पाकचा दावा

अन्य देशांना उगाच उपदेश करत फिरणाऱ्या पाकिस्तानने त्यांच्याच देशातील अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कारवाई करावी, असेही भारताने म्हटले आहे. 
मध्यंतरी काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला होता, तेथील गुरुद्वाराच्या वास्तूवर काही माथेफिरूंनी हल्ला केल्याचे म्हटले होते, यामुळे खळबळ निर्माण झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India warning to pakistan