
दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात 22 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली आहे.
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात 22 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली आहे. तिच्या या अटकेवरुन सध्या विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांनी सवाल केलाय की, शेतकऱ्यांचे समर्थन करणारे टूलकिट भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनपेक्षा धोकादायक आहे का? तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या कृतीला लोकशाहीवर अभूतपूर्व हल्ला म्हटलं आहे. या अटकेवर काँग्रेस नेते शशी थरुर, कम्युनिस्ट नेते सिताराम येच्यूरी यांच्यासहित अनेकांनी रोष व्यक्त केला आहे.
हेही वाचा - 'हा तर लोकशाहीवरचा हल्ला'; दिशा रवीच्या अटकेवरुन विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी ट्विट करुन सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे. त्यांनी फैज अहमद फैज यांच्या कवितेच्या ओळी टाकत म्हटलंय की 'ते घाबरले आहेत, देश नाही. देश गप्प बसणार नाही'
बोल कि लब आज़ाद हैं तेरे
बोल कि सच ज़िंदा है अब तक!वो डरे हैं, देश नहीं!
India won’t be silenced. pic.twitter.com/jOXWdXLUzY
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 15, 2021
काय आहे प्रकरण?
केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी गेल्या 80 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला जागतिक पातळीवरुन समर्थन मिळाल्यानंतर हा भारताच्या बदनामीचा आंतरराष्ट्रीय कट असल्याच्या संशयावरुन सरकारने या प्रकरणाची चौकशी लावली आहे. पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने या आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबतचे प्रोटेस्ट टूलकिट ट्विट केलं होतं जे नंतर डिलीट केलं आणि पुन्हा नवं टूलकिट ट्विट केलं. यावरुन हा भारताच्या बदनामीसाठीचा पूर्वनियोजित कट असल्याचा संशयावरुन सध्या याबाबत तपास केला जात आहे. याच तपासाअंतर्गत बेंगुलुरुच्या 22 वर्षीय दिशा रवी हिला रविवारी अटक करण्यात आली आहे. दिशा रवी ही ग्रेटा थनबर्गच्या फ्रायडेज् फॉर फ्यूचर या संघटनेची भारतातील संस्थापक आहे. हे टूलकिट तिने शेअर केल्याच्या आरोपासंदर्भात तिला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'भाजप आता नेपाळ-श्रीलंकेतही सरकार स्थापन करणार; अमित शहा यांचा मास्टरप्लॅन'
प्रियंका गांधीनीही साधला निशाणा
दिशाच्या अटकेवरुन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोमवारी ट्विट करत म्हटलंय की, बंदुक हातात असणारे एका निशस्त्र मुलीला घाबरत आहेत. एका निशस्त्र मुलीकडून हिंमतीचा प्रकाश पसरला आहे.
डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से
फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से#ReleaseDishaRavi #DishaRavi#IndiaBeingSilenced— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 15, 2021