esakal | 'भाजप आता नेपाळ-श्रीलंकेतही सरकार स्थापन करणार; अमित शहा यांचा मास्टरप्लॅन'
sakal

बोलून बातमी शोधा

biplav deb

बिप्लव देब यांनी म्हटलंय की गृहमंत्री अमित शहा यांनी नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये देखील भाजपचे सरकार स्थापन करण्याची योजना आखली आहे. 

'भाजप आता नेपाळ-श्रीलंकेतही सरकार स्थापन करणार; अमित शहा यांचा मास्टरप्लॅन'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देब आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता पुन्हा एकदा केलेलं एक विधान सध्या वादग्रस्त ठरलं आहे. बिप्लव देब यांनी यावेळेला आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल आपलं मत मांडलं आहे. त्यांनी म्हटलंय की, भाजप पक्ष फक्त देशातच नव्हे तर शेजारच्या देशात देखील आपला विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. बिप्लव देब यांनी म्हटलंय की गृहमंत्री अमित शहा यांनी नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये देखील भाजपचे सरकार स्थापन करण्याची योजना आखली आहे. 

हेही वाचा - Petrol-Diesel Price Hike Today: पुन्हा दरवाढ, घरगुती गॅसही महागला; जाणून घ्या आजचे दर
मुख्यमंत्री बिप्लव देब यांनी 2018 मध्ये त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या तयारीवेळी झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, जेंव्हा अमित शहा भाजपचे प्रमुख होते, तेंव्हा एका बैठकीच्या दरम्यान भारतामधील सर्व राज्यांमधील पक्षाच्या विजयानंतर 'परदेशातील विस्तारा'बाबत त्यांनी बातचित केली. बिप्लव देब यांनी 2018 मध्ये झालेल्या बातचितीचा हवाला देत म्हटलं की, आम्ही गेस्ट हाऊसमध्ये चर्चा करत होतो. त्यावेळी भाजपचे प्रादेशिक सचिव अजय जम्वाल यांनी म्हटलं की भाजपाने अनेक राज्यांमध्ये आपलं सरकार बनवलं आहे. याला उत्तर देताना अमित शहा यांनी म्हटलं की, आपल्याला पक्षाचा आणखी विस्तार करायचा आहे. आपल्याला श्रीलंका आणि नेपाळमध्ये सरकार बनवण्यासाठी पक्षाचा विस्तार करायचा आहे. 

हेही वाचा - भूकंपाच्या धक्क्यांची भारतात वाढती संख्या; गेल्या वर्षभरात बसले ९६५ धक्के
अमित शहा यांच्या कर्तृत्वाचा पाढा वाचताना बिप्लव देब यांनी पुढे म्हटलं की, अमित शहा यांच्याच नेतृत्वात भाजप पक्ष हा जगातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. जागतिक स्तरावरील सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून कम्यूनिस्ट पक्ष दावा करायचे मात्र, आता त्यांचा तो रेकॉर्ड भाजपाने मोडला आहे.  पुढे त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलं की, भाजप येत्या काळात केरळ, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमधील देखील सरकार स्थापन करेल, यात शंका नाही. 

loading image