

Indian Railways Offers Lifetime Free Travel to Gallantry Medal Winners and Families With Online E Pass Booking From 2026
sakal
नवी दिल्ली : भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील शौर्य पदक विजेत्या जवानांना रेल्वेमध्ये आजीवन मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. या सुविधेचा लाभ संबंधित पदक विजेत्यासह त्याचा पती किंवा पत्नीलाही मिळू शकेल. अविवाहित असतानाच हुतात्मा झालेल्या पदक विजेत्यांच्या पालकांना देखील ही सुविधा मिळू शकेल.