IAF चे हेलिकॉप्टर कोसळले; दोन वैमानिक हुतात्मा

वृत्तसंस्था
Friday, 27 September 2019

भारतीय लष्कराचे 'चित्ता' हे हेलिकॉप्टर भूतानमध्ये आज (शनिवार) कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिक हुतात्मा झाले आहेत.

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे 'चित्ता' हे हेलिकॉप्टर भूतानमध्ये आज (शनिवार) कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिक हुतात्मा झाले आहेत. ही दुर्घटना जंगलग्रस्त भागात घडल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. 

खेंतोन्गमानीजवळच्या टेकडीवर हा अपघात झाला असून, जंगलग्रस्त भागात हेलिकॉप्टर कोसळल्याने बचावकार्यास अडथळा निर्माण झाला असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांकडून देण्यात आली. ही दुर्घटना भूतानमध्ये घडली असून, भारतीय लष्कराचा वैमानिक हा लेफ्टनंट कर्नल रँकचा होता तर दुसरा भूतानी सैन्याचा वैमानिक होता. असे दोन वैमानिक या दुर्घटनेत हुतात्मा झाले.

भलेभले ईडीला घाबरतात, पण शरद पवार...

दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र, खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Pune Rains : 'निघून जा' म्हणत चंद्रकांत पाटलांवर पूरग्रस्तांचा रोष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An Indian Army Cheetah helicopter crashed in Bhutan