भलेभले ईडीला घाबरतात, पण शरद पवार...

टीम ईसकाळ
Friday, 27 September 2019

महाराष्ट्र राज्य गैरव्यवहार प्रकरणी ईडीने शरद पवार, अजित पवार यांच्यासह 71 नेत्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात येत आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्वतः ईडी कार्यालायत जाऊन माझ्यावर काय गुन्हा दाखल झाला आहे, हे जाणून घेणार असल्याचे म्हटले होते.

मुंबई : सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी म्हटले की, भल्याभल्यांना घाम फुटतो, शक्यतो ईडीची पिडा आपल्यामागे नको म्हणून पळ काढतात, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे असे नेते आहेत की ते स्वतः ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जात आहेत.

...म्हणून ईडी कार्यालयात जाणार नाही : शरद पवार

महाराष्ट्र राज्य गैरव्यवहार प्रकरणी ईडीने शरद पवार, अजित पवार यांच्यासह 71 नेत्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात येत आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्वतः ईडी कार्यालायत जाऊन माझ्यावर काय गुन्हा दाखल झाला आहे, हे जाणून घेणार असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांना मोदी सरकारला इशारा देत दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकणार नाही असा सूचक इशारा दिला होता. 

मीडियाशी बोलताना, शरद पवारांनी मानले कोणाचे आभार?

पवारांनी ईडी कार्यालयात जाणार असल्यानंतर आज सकाळपासून त्यांना ईडी कार्यालयात जाण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलिस आयुक्त संजय बर्वे स्वतः त्यांच्या घरी गेले आहेत. पण, ते तयार होतील असे वाटत नाही. राष्ट्रवादीला आगामी विधानसभेत सहानुभूती मिळविण्यासाठी हा खूप मोठा मुद्दा आहे. नेमका याच मुद्द्याचे राष्ट्रवादीकडून भांडवल करून सरकारला लक्ष्य करणार हे निश्चित आहे. ईडीने पत्र दिले असून तूर्तास चौकशीची गरज नसल्याचे म्हटले आहे, तसेच भविष्यातही चौकशीची गरज पडणार नाही, असे या पत्रात सांगण्यात आले आहे. परंतु शरद पवार हे मागे हटणार नाहीत हे निश्चित आहे.

राष्ट्रवादीकडून नेहमीच सर्वसामान्यांचा विचार : रोहित पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar and ED inquiry