

Army Evaluates Plan to Induct Women into Territorial Army
Esakal
भारतीय लष्कराला संलग्न असणाऱ्या प्रादेशिक सैन्यात आता महिलांच्या समावेशासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महिलांचाही प्रादेशिक सैन्यात समावेश करण्याबाबत एक पायलट प्रोजेक्ट लष्कराकडून सुरू करण्यात येणार आहे. यात काही बटालियनमध्ये भरती सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भारताच्या लष्करातील सर्व विभागांमध्ये महिलांना संधी देऊन नारी शक्ती मोहिमेला बळकट करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यातलाच एक भाग म्हणून प्रादेशिक सैन्यात महिलांचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं म्हटलं जातंय.