Video : गुरगुरणाऱ्या चीनविरोधात शड्डू; 'एलएसी'वर भारतीय सैन्यासह टी-९० टँक तैनात

वृत्तसंस्था
Sunday, 27 September 2020

२९-३० ऑगस्ट रोजी पूर्व लडाखमध्ये चीनी सैन्याने हस्तक्षेप करत सद्यस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला. याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आणि चीनी सैन्याला माघार घ्यायला भाग पाडलं.

नवी दिल्ली : चीनविरुद्ध सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने (Indian Army) आपले रणगाडे (टँक) एलएसी (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) जवळ तैनात केले आहेत. यासंदर्भात 'एएनआय' या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये भारतीय लष्कराचे टँक आणि चिलखती वाहने पूर्व लडाखमधील चुमार-डेमचोक भागातील चौक्यांवर तैनात केले असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये टी-९० टँक आणि बीएमपी-२ इन्फंट्री कॉम्बॅट वाहनांचा समावेश आहे. भारत आणि चीनमधील सीमावाद कायम असल्याने दोन्ही देशांनी लडाखमधील उंचीच्या ठिकाणी आपापले सैन्य हत्यारासहित तैनात केलं आहे.

कोरोनाचा कहर संपता संपेना​

१४ कॉर्प्स ऑफ स्टाफचे चीफ मेजर जनरल अरविंद कपूर म्हणाले, "फायर अँड फ्यूरी कॉर्प्स ही भारतीय सैन्याची एकमेव तुकडी आहे, जी अत्यंत कठीण भागात आणि परिस्थितीत कार्यरत राहते. टँक, पायदळ आणि लढाऊ वाहने आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा तयार ठेवणे हे एक आव्हान आहे."

दरम्यान, २९-३० ऑगस्ट रोजी पूर्व लडाखमध्ये चीनी सैन्याने हस्तक्षेप करत सद्यस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला. याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आणि चीनी सैन्याला माघार घ्यायला भाग पाडलं. त्यानंतर भारतीय सैन्याने पँगाँग लेकच्या दक्षिणेकडील भागातील एका टेकडीवर कब्जा केला. रणनीतीदृष्ट्या हा भाग महत्त्वाचा मानला जातो. 

'आधी घरात दिवा लावा नंतर...'; संयुक्त राष्ट्रातील मोदींच्या वक्तव्यावर ओवैसींची टीका​

भारताने पुन्हा एकदा चीनला इशारा देत सद्यस्थितीत कोणताही बदल करण्याचा प्रयत्न करू नये, असे सुनावले आहे. सीमावादावरून चीनशी लष्कराने केलेल्या चर्चेनंतर गुरुवारी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली. या भागातील सद्यस्थितीत बदल होईल अशा पद्धतीचा कोणताही एकतर्फी प्रयत्न टाळण्याची खबरदारी घेतली जाईल. मात्र, शांती राखण्यासाठी दोन्ही देशांनी संभाषण सुरू ठेवणे गरजेचे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian army deploys T90 tank with infantry combat vehicles near LAC Ladakh