Indian Army : ‘आर्मेक्स-२४’ मोहीम यशस्वी; १४६ किलोमीटरचा खडतर प्रवास पूर्ण
Endurance Mission : उत्तर बंगालपासून सिक्कीमच्या बर्फाच्छादित पर्वतांपर्यंत १४६ किलोमीटरचा कठीण प्रवास करत भारतीय जवानांनी 'आर्मेक्स-२४' मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. २४ दिवसांच्या या साहसी मोहिमेने लष्कराच्या चिकाटीचे दर्शन घडवले.
गंगटोक : उत्तर बंगालच्या दाट जंगलांपासून ते सिक्कीमच्या बर्फाच्छादित खडतर पर्वतांवर १४६ किलोमीटरचा अत्यंत कठीण आणि प्रतिकूल स्थितीतील प्रवास करत भारतीय जवानांनी ‘आर्मेक्स २४’ ही साहसी मोहीम पूर्ण केली आहे.