पाकिस्तानी कॉडकॉप्टरला भारतीय सैन्याने दाखवली जागा; पाहताच क्षणी केलं शूट

quadcopter
quadcopter

नवी दिल्ली- भारतीय सैन्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये एक पाकिस्तानी कॉडकॉप्टर हाणून पाडले आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार हे पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल सर्विस गुप्रचे कॉडकॉप्टर आहे. सकाळी 8 वाजता याला पाहिल्यानंतर भारतीय जवानांनी याला शूट केले. कॉडकॉप्टर एलओसीच्या 70 मीटर भारतीय हद्दीत आले होते, त्याला केरन सेक्टरमध्ये पाडण्यात आले. हे कॉडकॉप्टर चिनी कंपनी डीजेआईने बनवलेले आहे. 

सीमेच्या पलिकडून शस्त्र आणि इतर काही वस्तू ड्रोनच्या साहय्याने पाडल्या जातात. अनेकवेळा दहशतवादी आपल्या साथीदारांना सीमेपलिकडून काही वस्तू आणि शस्त्र पाठवत असतात. पाकिस्तानच्या बाजूने अनेकवेळा असे प्रयत्न झाले आहेत. पाकिस्तान पंजाब, जम्मू, राजस्थानच्या मार्गाने शस्त्र पाठवण्याचा प्रयत्न वारंवार करत आला आहे. भारतीय लष्कराने अनेकदा त्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com