Extra Marital Affair: बायकोनं गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलंय? काय सांगतो कायदा एकदा वाचाच

तुमचं एक्स्ट्रा मॅरेटल अफेअर बायकोला कळलं तर काय होईल? कायद कोणाच्या बाजून बोलतो एकदा वाचाच
Extra Marital Affair
Extra Marital Affairesakal

Indian Rule: लग्न झाल्यानंतरही अनेकांचे बाहेर अफेअर सुरू असतात. अनेकांचे अफेअर्स त्यांच्या बायका/नवऱ्याला माहिती होत नाहीत. मात्र पत्नीला जेव्हा नवऱ्यावर संशय येतो त्याच्या काही दिवसांत अशा अफेअर्सचा भांडाफोड होतो. हे प्रकरण नंतर थेट घटस्फोटासाठी कोर्टापर्यंत पोहोचतं. मात्र तुमचं एक्ट्रा मॅरेटल अफेअर असलं तर तुमच्यावर खरंच गुन्हा दाखल होतो का? याची कल्पना तुम्हाला आहे काय?

Extra Marital Affair असणं गुन्हा आहे काय?

एखाद्या पतीचं लग्नानंतर बाहेर दुसऱ्या महिलेबरोबर अफेअर असेल तर तो गुन्हा ठरत नाही. तुम्हाला तुमच्याच पत्नीने रंगेहाथ पकडलं तरी त्यावेळी पोलीस देखील तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही. मात्र तुमचं बाहेरील अफेअर तुमच्या पत्नीला माहिती झाल्यास ती घटस्फोट घेण्याचा निर्णय घेऊ शकते. या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये विवाहबाह्य संबंधाबाबत ऐतिहासिक निकाल जाहिर केला होता.

Extra Marital Affair
Marriage : बायकोला लागली सरकारी नोकरी आणि नवऱ्याला म्हणते, "तू कोण ?"

काय होता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?

न्यायालयाने त्यांच्या निकालामध्ये, १५८ वर्षांपूर्वीचं भारतीय दंड संहितेतील कलम ४९७ अवैध ठरवलं होतं. एस्क्ट्रा मॅरेटल अफेअर असणं गुन्हा नाही असे न्यायालयाने म्हटले होते. पुरुष आणि स्त्री समान असून पती पत्नी एकामेकांवर वर्चस्व गाजवू शकत नाही, असंही न्यायालयाने सुणावणीवेळी म्हटलं.

Extra Marital Affair
Extramarital Affairs का होतात?

विवाहबाह्य संबंधांना इंग्रजी भाषेत 'अडल्ट्री' असंही म्हटलं जातं. पुरुष किंवा स्त्री त्यांचं लग्न झालेलं असतानाही दुसऱ्या महिलेसोबत किंवा पुरुषासोबत संबंध ठेवू शकतात. त्यात अवैध काहीही नाही असा निकाल खुद सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. यालाच एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com