antonio guterres
antonio guterres

भारत सरकारने गुटेरेस यांचा काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळला

नवी दिल्ली/इस्लामाबाद - संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी का‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी करण्याचा दिलेला प्रस्ताव भारत सरकारने आज साफ फेटाळून लावला.  

अँटोनिओ गुटेरेस चार दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी इस्लामाबाद येथे काल (ता. १६) पत्रकार परिषद घेत काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थीची तयारी दर्शविली. गुटेरेस म्हणाले की, जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीबाबत आणि सीमेवर असलेल्या तणावाबाबत चिंता वाटत आहे. दोन्ही देश मध्यस्थीसाठी तयार असतील, तर मी मदत करू शकतो. 

परराष्ट्र मंत्रालयाने गुटेरेस यांचा हा प्रस्ताव अमान्य केला. ‘जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अंतर्गत भाग आहे. त्यामुळे मध्यस्थी करण्याऐवजी घुसखोरी थांबविण्यासाठी आणि बेकायदा पद्धतीने त्यांच्या ताब्यात असलेला भूप्रदेश मुक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी प्रयत्न करावेत,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी आज स्पष्ट केले. काश्‍मीरबाबत जर काही वाद असल्यास तो द्विपक्षीय चर्चेतूनच सोडविला जाईल, असे रवीशकुमार यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com