भंडाऱ्यासारखी आग लागू नये म्हणून नक्की काय करावं? 'हे' आहेत रुग्णालयांसाठी सरकारनं आखून दिलेले नियम

अथर्व महांकाळ
Saturday, 9 January 2021

प्रत्येक रुग्णालयाचं आग लागण्यापासून संरक्षण करण्यासाठी भारत सरकारनं काही नियम सांगितले आहेत. तसंच रुग्णालय बांधताना प्रशासनाकडे सर्व कागदपत्रं असणं आवश्यक आहे. याच बद्दलचे सरकारनं आखून दिलेले नियम आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नागपूर : देशात गंभीर आग लागल्याच्या घटना आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. आजपर्यंत देशात अनेकवेळा रुग्णालयांमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटना इतक्या गंभीर असतात की यात अनेक निष्पाप लोकांना आणि रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात. पण कुठल्याही इमारतीला किंवा रुग्णालयाला आग लागण्याचं कारण काय? या मागचं प्रमुख कारण म्हणजे या रुग्णालयांमधील आगीच्या घटना टाळण्यासाठी असलेली तोकडी व्यव्यस्था. प्रत्येक रुग्णालयाचं आग लागण्यापासून संरक्षण करण्यासाठी भारत सरकारनं काही नियम सांगितले आहेत. तसंच रुग्णालय बांधताना प्रशासनाकडे सर्व कागदपत्रं असणं आवश्यक आहे. याच बद्दलचे सरकारनं आखून दिलेले नियम आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रुग्णालयातील आग टाळण्याबाबत सरकारनं सांगितलेले नियम : 

मोकळी जागा : 

 • रुग्णालयाच्या आत आणि बाहेर मोकळी जागा असावी ज्यामुळे रूग्णांना आणि इतरांना जागेची कमतरता भासू नये. त्याचबरोबर आग लागल्यास या मोकळ्या जागेत रुग्णांना हलवण्याची आणि अग्निशमन विभागाच्या गाड्या थांबण्याची सोय असावी. 
 • आग विझवण्यासाठी  रुग्णालयांमध्ये मोकळे व्हरांडे असावेत ज्यामुळे अग्निशमन विभागाला रुग्णालयात जाता येईल. 
 • रुग्णालयाच्या मुख्य दाराची रुंदी ४.५ - ५ मीटरपेक्षा कमी नसावी. 
 • रुग्णलयातील प्रत्येक खोली मोकळी असावी. 
 • रुग्णालयाच्या मुख रस्त्याची रुंदी १२ मीटरपेक्षा जास्त असावी.     

हेही वाचा  - कोलकात्यामधील ९० रुग्ण ते भंडाऱ्यातील दहा बालकांचे मृत्यूतांडव; वाचा देशाला हादरविणाऱ्या आगीच्या...

 
सुरक्षित बाहेर निघण्याचा मार्ग:  

 • रुग्णालयातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी असलेल्या मार्गाची रुंदी जास्त असावी. 
 • बाहेर पडण्यासाठीच्या दारांवर 'बाहेर' असं लिहिणं आवश्यक आहे. 
 • साधारणतः बाहेर निघण्यासाठीचं दार रुग्णांना लगेच दिसेल अशा ठिकाणी असावं.         

रुग्णालयातील विभागीकरण : 

 • प्रत्येक रुग्णालयात रुग्णांच्या सोयीनुसार विभागीकरण करणं आवश्यक आहे. 
 • रुग्णालयाच्या प्रत्येक विभगात २८० चौरस मीटर जागा मोकळी असावी ज्यामुळे रुग्णांना एका विभागातून दुसऱ्या विभागात हलवणं शक्य होईल. 
 • ५०० चौरस मीटर किंवा त्यापेक्षा मोठ्या विभागात २ तास आग सहन करू शकतील अशा भिंती असणं आवश्यक आहे. तसंच तिथे स्मोक डिटेक्टर असणंही आवश्यक आहे. 

बांधकाम : 

 • रुग्णलयात सर्व ठिकाणी किमान २ तास आग सहन करू शकतील अशा भिंती आणि जिना असणं आवश्यक आहे. 
 • रुग्णालयातील इलेकट्रीकल वायरिंग कमी व्होल्टेजची आणि आगीपासून बचाव करणारी लावण्यात यावी. 
 • बांधकाम करताना स्मोक डिटेक्टर्स लावून घेणं आवश्यक आहे. 

नक्की वाचा - अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घराचं शेजाऱ्यांनी उघडलं दार; पलंगाजवळील दृश्य बघून भल्याभल्यांचा उडाला थरकाप 

रुग्णालयात 'या' गोष्टी असणं आवश्यक : 

 • आगीपासून संरक्षण करण्यासाठी रुणालयात पाण्याची स्वतंत्र टाकी असणं आवश्यक आहे. या टाकीतील पाणी आग विझविण्याच्या कामात येईल. 
 • प्रत्येक रुग्णालयात फायर पंप रूम असणं आवश्यक आहे.  या रूमच्या माध्यमातून रुग्णालयातील आग लागलेल्या सर्व विभागांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम होऊ शकेल. 
 • रुग्णालयात आगीपासून बचाव करण्यासाठी 'ऑटोमॅटिक स्प्रिंकल सिस्टम' असणं महत्वाचं आहे. आग लागल्यास रुग्णालयात पाण्याचे फवारे सुरू होऊन आग विझवण्यात मदर्त होऊ शकेल. 
 • रुग्णालयातून बाहेर पडण्याच्या मार्गावर भडक लाईट्स असावेत ज्यामुळे आग लागल्यानंतर रुग्णांना बाहेर पडण्यास मदत होईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Government tells about terms and conditions for avoiding fire in Hospitals