आज 11 डिसेंबरला दवाखान्यात जाताय? आज आहे डॉक्टरांचा संप; वाचा काय सुरु, काय बंद

doctor
doctor

नवी दिल्ली : आपण जर आज दवाखान्यात जाणार असाल तर  थोडं थांबा. कारण आज आपल्याला दवाखान्यात डॉक्टर भेट देतीलच याची काही शाश्वती नाहीये. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) आज 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या आपत्कालीन नसलेल्या आणि कोविड मेडिकल सेवेशी निगडीत नसलेल्या सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आउटडोर पेशंट डिपार्टमेंट (OPD) देखील बंद असेल याचा अर्थ रुग्णांना आज तपासले जाणार नाहीये. IMA ने मॉडर्न मेडिसिनचे सर्व डॉक्टर्सना या बंदमध्ये सामिल होण्याचं आवाहन केलं आहे. सेंट्रल काउंसिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या एका सुचनेवरुन हे पाऊल उचललं गेलं आहे. यामध्ये आयुर्वेदातून पोस्ट-ग्रॅज्यूएट असणाऱ्याला सामान्य सर्जरीसाठी मान्यता दिली गेली आहे, ज्यावरुन डॉक्टरांनी हरकत घेत हा संप पुकारला आहे. देशभरातील 1 लाख 10 हजार डॉक्टरांचा यात सहभाग असणार आहे.


11 डिसेंबरला काय असेल बंद?

  • सर्व नॉन-एमर्जन्सी हेल्थ सेंटर्स
  • आउटडोर पेशंट डिपार्टमेंट
  • इलेक्टिव सर्जरी

काय असेल सुरु?

  • आयसीयू
  • कोविड केअर
  • सीसीयू
  • इमर्जेंसी सर्जरी
  • लेबर रुम

काय आहे नवा बदल?
आयुर्वेदात दोन प्रकारच्या सर्जरी असतात. शल्य तंत्र (जनरल सर्जरी) आणि शाल्क्य तंत्र (डोळे, कान, नाक, दात आणि घशाची सर्जरी). सर्व पोस्ट ग्रॅज्यूएट विद्यार्थ्यांना यामध्ये तज्ज्ञता प्राप्त करुन आयुर्वेद सर्जन होता येतं. नोटिफिकेशनमध्ये 58 अशा सर्जरी सांगितल्या गेल्या आहेत ज्यांचे ट्रेनिंग आयुर्वेदाच्या पोस्ट ग्रॅज्यूएट विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. यामध्ये जनरल सर्जरीशिवाय यूरॉलॉजी, सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि ऑफथॅलमोलॉजीच्या सर्जरीचाही समावेश आहे.

IMA चं काय आहे म्हणणं?
IMAने केंद्र सरकारच्या या कृतीला 'मिक्सोपॅथी' म्हटलं आहे. IMA ने आयुर्वेद डॉक्टर्सच्या सर्जरी करण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एका आयुर्वेद चिकित्सक आणि भारतीय चिकित्साच्या शिक्षकाने IMA ला नोटीस पाठवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com