भारतीय रेल्वेने घडवला इतिहास; सुरु केली जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन 'लाईफलाईन एक्सप्रेस'

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 3 January 2021

भारतीय रेल्वेने कोरोना महामारीच्या काळातही (Indian Railway) इतिहास रचला आहे

नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने कोरोना महामारीच्या काळातही (Indian Railway) इतिहास रचला आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेने जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन (Hospital Train) बनवून रिकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जगातील ही अशाप्रकारची पहिलीच ट्रेन आहे. 

रेल्वे मंत्रालयानुसार, रेल्वेला लाईफलाईन एक्सप्रेस (The Lifeline Express)  असं नाव देण्यात आलं आहे. या ट्रेनमध्ये हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सर्व सुविधा आहेत. रेल्वे मंत्रालयाने ट्विटरच्या माध्यमातून हॉस्पिटल ट्रेनचे फोटो शेअर केले आहेत. 

कोवॅक्सिनला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच मंजुरी? एम्स प्रमुखांनी...

लाईफलाईन एक्सप्रेस ट्रेन आसामच्या बदरपूर स्टेशनवर तैनात असल्याची माहिती देण्यात आली आहे. या हॉस्पिटल ट्रेनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उपकरणे आणि डॉक्टर्सची टीम असणार आहे. ज्यात 2 मॉडर्न ऑपरेसन थिएटर आणि 5 ऑपरेटिंग टेबलसोबत अन्य सुविधा उपलब्ध असतील. लाईफलाईन एक्सप्रेसमध्ये रुग्णांच्या मोफतमध्ये उपचाराची सुविधा आहे. रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेल्या फोटोंमधून अंदाजा येऊ शकतो की, ट्रेनमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) अनेक उपाय योजले आहेत. रेल्वे स्टेशनवर ऑटोमॅटिक तिकीट चेकिंग मशीनसह (Automated Ticket Checking) अन्य अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात आधुनिक होत जाणाऱ्या रेल्वेने मेडिकल असिस्टेंटसह अनेक आधुनिक मशीनचा वापर सुरु केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Railway first Hospital Train The Lifeline Express will start