Indian Railways Loyalty Program
esakal
रेल्वे विभाग प्रवाशांसाठी भन्नाट योजना आणण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार प्रवाशांना ट्रेनमध्ये मोफत चहा-नाश्ता, जेवण, लोअर बर्थ आणि लाऊंजसारख्या सुविधा मिळणार आहेत. विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाकडे आकर्षित करणं हा या मागचा उद्देश आहे. त्यासाठी रेल्वे ‘लॉयल्टी प्रोग्राम’ सुरू करणार आहे.