रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! २७ ऑक्टोबरपासून काउंटरवरील तिकिटांनाही मिळणार विमा संरक्षण; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २७ ऑक्टोबर २०२६ पासून काउंटरवरून घेतलेल्या रेल्वे तिकिटांनाही विमा संरक्षण मिळणार आहे. जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम.
Indian Railways Offline Ticket Insurance

Indian Railways Offline Ticket Insurance

sakal

Updated on: 

INDIAN RAILWAYS INSURANCE COVERAGE FOR OFFLINE TICKETS: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आतापर्यंत ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना मिळणारे विमा संरक्षण आता रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरवरून तिकीट घेणाऱ्यांनाही मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले असून, २७ ऑक्टोबर २०२६ पासून काउंटरवरून काढलेल्या सर्व रेल्वे तिकिटांसाठी विमा संरक्षण देणे बंधनकारक असणार आहे. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास त्याची थेट जबाबदारी रेल्वे बोर्डावर असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com