
‘कोरोनावरील भारतीय लस अत्यंत सुरक्षित व वैज्ञानिक कसोट्यांवर उतरली आहे. लसीकरणानंतर काही परिणाम जाणवणे हे सर्वसामान्य आहे. भारतीय लस कोरोना महामारीच्या शवपेटीवरील अखेरचा खिळा म्हणून सिद्ध होईल,’ असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज व्यक्त केला. लसीकरणावरून काही लोकांकडून राजकारण सुरू असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
नवी दिल्ली - ‘कोरोनावरील भारतीय लस अत्यंत सुरक्षित व वैज्ञानिक कसोट्यांवर उतरली आहे. लसीकरणानंतर काही परिणाम जाणवणे हे सर्वसामान्य आहे. भारतीय लस कोरोना महामारीच्या शवपेटीवरील अखेरचा खिळा म्हणून सिद्ध होईल,’ असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज व्यक्त केला. लसीकरणावरून काही लोकांकडून राजकारण सुरू असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम भारतात सध्या सुरू असली तरी प्रतिसाद कमी आहे, कारण डॉक्टर व आरोग्यसेवक लसीकरणासाठी तयार होत नाहीत व लस वाया जात आहे, अशा तक्रारी महाराष्ट्रासह अनेक राज्यांकडून येत आहेत. विशेषतः भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीबद्दल खुद्द वैद्यकीय क्षेत्रातच सार्वत्रित भीती व असुरक्षितता व्यक्त होत असल्याचे वृत्त आहे. लसीकरणाबाबतच्या शंकानिरसनासाठी केंद्राने विशेष ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ तयार केला आहे व त्यावर लसीकरण झालेल्यांचे अनुभवही प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
किमान ६ राज्यांनी काल (बुधवारी) केंद्राला कळवले की, लोकच पुढे येत नसल्याने लस वाया जात आहे. राज्यात पहिल्या ५-६ दिवसांत उद्दिष्टाच्या ५० ते ५२ टक्केच लसीकरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. हर्षवर्धन यांनी आज लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, लोकांनी लस घेण्यास कचरण्याचे काहीही कारण नाही. ती प्रभावी व सुरक्षित आहे. देशाच्या कोरोना कृतीगटाच्या प्रमुखांनी (डॉ. रणदीप गुलेरिया) सर्वप्रथम स्वतः लसीकरण करून घेतले आहे. काही लोक राजकीय हेतूने लसीकरणाबाबत गैरसमज पसरवत आहेत हे दुर्दैवी आहे.
'हम तेजस्वी यादव बोल रहे हैं, DM साहब'; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
लसीकरणाचे प्रमाण ५५ टक्केच
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार १६ जानेवारीला लसीकरण सुरू झाल्यापासून देशात १४ हजार ११९ ठिकाणी झालेल्या लसीकरणात आतापावेतो ७ लाख ८६ हजार ८४२ जणांना कोरोना लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यात देशातील ३ कोटी आरोग्य सेवकांना लसीकरणाचा लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. देशात आतापावेतो लसीकरणाचे प्रमाण सरासरी ५५ टक्केच राहिलेले आहे.
काँग्रेस शोधतेय राहुल गांधींना पर्याय; अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेता
पंतप्रधान, मुख्यमंत्रीही घेणार लस
लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात भारतातील २७ कोटी जणांना लस देण्यात येणार आहे. यात ५० वर्षांपुढील नागरिकांचा समावेश असेल. ७० वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच दुसऱ्या टप्प्यात मार्च किंवा एप्रिल महिन्यात लस घेण्याची शक्यता आहे, असे आरोग्य मंत्रालय सूत्रांनी सांगितले. याच टप्प्यात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही लस दिली जाईल. मात्र मोदी यांच्या केव्हा लस घेतील याची नेमकी तारीख सांगण्यास सूत्रांनी नकार दिला.
Edited By - Prashant Patil