Indian Woman Murdered in Australia: ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय महिलेची हत्या; कचराकुंडीत आढळला मृतदेह, घटनेने खळबळ

Indian Woman Murdered in Australia: ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय महिलेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेचा मृत्यू कचराकुंडीत सापडला आहे.
Indian Woman Murdered in Australia
Indian Woman Murdered in AustraliaEsakal

Indian Woman Murdered in Australia: ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेचा मृतदेह कचराकुंडीत सापडला आहे. या महिलेची हत्या तिच्या पतीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. ही महिला गेल्या काही दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

स्थानिक माध्यमांमुळे ही घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय महिला चैतन्या मधागनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या कुंटुंबासोबच ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती. ती मुळ हैदराबाद येथील आहे. या महिलेचा मृतदेह शनिवारी एका रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कचराकुंडीत आढळला. चैतन्या मधागनी हिची पती अशोक राज हा आपल्या ५ वर्षाच्या मुलासह ५ मार्चला भारतात आला होता. तेव्हापासूनच चैतन्या मधागनी बेपत्ता होती. ती गेल्या काही दिवसांपासून कोणच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर आली होती.

Indian Woman Murdered in Australia
PM Modi : पुतिन करणार होते युक्रेनवर अणुबॉम्ब हल्ला, पण मोदींच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला; US रिपोर्टमध्ये दावा

चैतन्या मधागनीचा पती अशोक राज याने ऑस्ट्रेलियातील आपल्या घराच्या शेजारी राहणाऱ्यांकडे तसेच जवळच्या व्यक्तींकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अशोकने पोलिसांशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच पोलिसांना चौकशीमध्ये पुर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. या हत्येबाबत पोलिसांना काही पुरावे देखील सापडले आहेत. पोलिसांच्या व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार, आरोपी ऑस्ट्रेलियातून पळून गेला आहे. पोलिसांनी चैतन्या मधागनीच्या जवळच्या व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे.

Indian Woman Murdered in Australia
David Miller : क्रिकेटर डेव्हिड मिलरने गर्लफ्रेंड कॅमिला हॅरिसशी केलं लग्न; Photo Viral

उप्पलचे आमदार बंडारी लक्ष्मा रेड्डी यांनी सांगितले की, ही महिला त्यांच्या भागातील होती आणि त्यांनी त्या महिलेच्या कुटुंबाचीही भेट घेतली आहे. रेड्डी म्हणाले की, महिलेच्या पालकांच्या विनंतीवरून त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला महिलेचा मृतदेह भारतात आणण्यासाठी पत्रही लिहिले आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनाही कळवले असल्याचे आमदाराचे म्हणणे आहे.

पुढे ते म्हणाले की, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीच्या पतीने(जावयाने) तिची हत्या केल्याचे कबुल केले आहे.

Indian Woman Murdered in Australia
Nigeria : नायजेरियातल्या शाळेतून ३०० विद्यार्थ्यांचे अपहरण; दोन दिवसांनंतरही मुलांचा शोध लागला नाही

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com