'बलात्कारानंतर मी थकून झोपले' तिच्या या उत्तरावर न्यायाधीश म्हणाले, भारतीय महिला...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला होता. न्यायालयाने आरोपीच्या जामिनाच्या याचिकेवर सुनावणी केली.

बेंगळुरू - कर्नाटक उच्च न्यायालायने एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीवेळी म्हटलं की, बलात्कारानंतर थकून झोपणं हे भारतीय महिलांचे वागणं नाही. एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला होता. न्यायालयाने आरोपीच्या जामिनाच्या याचिकेवर सुनावणी केली. यावेळी महिलेनं तिच्या जबाबात म्हटलं होतं की, बलात्कारानंतर ती थकून झोपली होती. महिलेच्या या वक्तव्यावर न्यायाधीश कृष्णा एस दीक्षित यांनी आक्षेप नोंदवला.

न्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर आणि काही अटी घालून निर्दोष सोडलं. न्यायाधीशांनी तक्रार करणाऱ्या महिलेचं स्पष्टीकरण न पटणार असल्याचं म्हटलं. न्यायाधीश म्हणाले की, बलात्कारानंतर थकल्यानं झोपले हे इथं ग्राह्य धरता येणार नाही. भारतात बलात्कार झाल्यावर महिला अशा वागत नाहीत. 

नेहमी वापरण्यात येणा-या एटीएम मशीनचा शोध कसा लागला माहितीय का....वाचाच त्याचा रंजक इतिहास

याचिकाकर्त्याला जामिन देताना न्यायाधीश म्हणाले की, तक्रारदार महिला न्यायालयाला घटनाक्रम समजून देण्यात अयशस्वी ठरली. ज्यादिवशी घटना घडली तेव्हा रात्री 11 वाजता ती ऑफिसला का गेली? आरोपीसोबत दारु प्यायल्यानंतर कोणत्याच प्रकारचा आक्षेप का घेतला नाही. न्यायालयाने बलात्कारातील आरोपीला सहा अटींवर जामिन मंजूर केला. त्यानुसार एकाही अटीचं उल्लंघन झाल्यास त्याचा जामिन रद्द केला जाणार आहे. याशिवाय आरोपीला महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी पोलिस स्टेशनला हजेरी द्यावी लागेल. 

तक्रार केलेल्या महिलेच्या वकीलांनी या जामिनाला विरोध करताना म्हटलं की, आरोपीवर लावण्यात आलेले आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत. ते सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आरोपीला देण्यात आलेला जामीन हा समाजासाठी धोकादायक आहे. त्यामुळे जामिनाची याचिका फेटाळून लावण्यात यावी.

 फेसबुक लाईव्ह करून पत्नीवर झाडली गोळी अन्...

न्यायाधीश म्हणाले की, गंभीर गुन्हा हा नागरिकाचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा आधार असू शकत नाही. तेव्हा ज्यावेळी पोलिसांकडून एफआयआर दाखल करून घेतली नसेल. तक्रार करणाऱ्या महिलेनं आरोप केला होता की, लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केला. पण परिस्थिती पाहता यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. तसंच संबंधिक महिला त्याचवेळी न्यायालयाकडे का आली नाही ज्यावेळी आरोपी तिच्याशी शरीरसंबंधासाठी मागणी करत होता. 

महिलेनं हे नाही सांगितलं की, ती रात्री 11 वाजता तिच्या ऑफिसला काय करायला गेली होती. तिने याचिकाकर्त्यासोबत दारु प्यायल्यानंतर सकाळपर्यंत राहिल्यानंतरही कोणताच आक्षेप नोंदवला नाही. त्यानंतर महिलेनं असं स्पष्टीकरण दिलं की बलात्कारानंतर ती थकून गेली होती आणि झोपली होती. भारतीय महिला बलात्कारानंतर अशा वागत नाहीत असं म्हणत न्यायालयाने याचिककार्त्याला जामिन मंजूर केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian women never do that after rape says karnataka high court judge