दरवर्षी तब्बल इतके भारतीय होतात परदेशी; आकडेवारी धक्कादायक

Indian become Foreigners  news
Indian become Foreigners newsIndian become Foreigners news

नवी दिल्ली : मागील काही वर्षांत भारतीय (Indians) नागरिकांचा परदेशी नागरिकत्व (Foreigners) घेण्याचा कल वाढला आहे. चांगली शिक्षण व्यवस्था आणि चांगल्या नोकरीच्या शोधात परदेशात स्थलांतरित झालेल्या बहुतेकांनी आता तिथले नागरिकत्व घ्यायला सुरुवात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे एक लाख लोक भारत सोडून इतर देशांचे नागरिकत्व घेत आहेत.

काही महिन्यांपूर्वीच गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना भारतीय (Indians) नागरिकांनी परदेशी नागरिकत्व (Foreigners) घेतल्याची आकडेवारी मांडली होती. ही आकडेवारी खरोखरच धक्कादायक होती. २०१५ मध्ये १,४१,००० तर २०१६ मध्ये १,४४,००० भारतीय नागरिकांनी परदेशी नागरिकत्व घेतले. २०१९ पर्यंत ही संख्या वाढतच गेली.

Indian become Foreigners  news
मुलगी झोपेत अंथरूण ओला करायची; महिलेने गरम वस्तूने लावले गुप्तांगावर डाग

२०२० मध्ये हा आकडा थोडासा खाली आला होता. मात्र, २०२१ पासून हा आकडा पुन्हा १,००,००० च्या जवळपास गेला आहे. म्हणजेच दररोज ३५० हून अधिक भारतीयांना परदेशी नागरिकत्व मिळत आहे. चांगले शिक्षण, चांगल्या करिअरची हमी आणि आर्थिक समृद्धीच्या शोधात भारतीय परदेशात जात आहेत आणि तिथले नागरिकत्व घेऊन स्थायिक होत आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या देशांना दिले प्राधान्य

२०१७ ते २०२१ पर्यंत ४२ टक्के भारतीयांनी (Indians) अमेरिकेला (US) पहिली पसंती दिली. कॅनडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅनडाचे पाच वर्षांत ९१ हजार भारतीय लोकांनी नागरिकत्व मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया ८६ हजार लोकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ६६ हजार लोकांसह इंग्लंड आणि २३ हजार लोकांसह इटली अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.

Indian become Foreigners  news
‘आई व्हायचे आहे, कैदी पतीला पॅरोल द्या’; सरकार पोहोचले सर्वोच्च न्यायालयात

स्थलांतराची ही आहेत कारणे

भारतात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गमावणे, चांगल्या शिक्षण व्यवस्थेचा अभाव आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी व्यावसायिक वातावरणाचा अभाव ही स्थलांतराची सर्वांत मोठी कारणे असल्याचे अनेक शोधनिबंधांमधून समोर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com