Break-Free Toll Plaza : देशातील पहिला ‘ब्रेक फ्री’ टोल प्लाझा ‘या’ राज्यात झाला तयार! ; २ फेब्रुवारी पासून चाचण्या सुरू

Barrier-free toll system: : जाणून घ्या, नेमकं कसं काम करणार? अन् यामुळे सरकारला नेमका काय अन् किती फायदा होणार?
Toll Plaza
Toll PlazaSakal
Updated on

What Is a Break-Free Toll : देशातील टोल संकलन प्रणाली पूर्णपणे बदलण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, भारतातील पहिला बहु-लेन अडथळामुक्त टोल प्लाझा गुजरातमध्ये पूर्ण झाला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) २ फेब्रुवारी रोजी या अत्याधुनिक टोल प्रणालीच्या चाचण्या सुरू करणार आहे. यामुळे आता, महामार्गावर प्रवास करताना, टोल प्लाझावर ब्रेक लावण्याची गरज भासणार नाही आणि आता वाहनांच्या लांब रांगाही लागणार नाहीत, आणि वेळही वाया जाणार नाही.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०२६ च्या अखेरीस देशभरातील १,०५० हून अधिक टोल प्लाझांना एआय-आधारित मल्टी-लेन फ्री फ्लो सिस्टीममध्ये रूपांतरित करण्याची योजना आखली आहे. जर गुजरातमधील हा पायलट प्रकल्प यशस्वी झाला, तर देशभरातील महामार्गांवरील टोल प्लाझाचा चेहरा पूर्णपणे बदलू शकतो.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे टोल प्लाझावरील गर्दी आणि कोंडीची समस्या दूर करण्याबद्दल बऱ्याच काळापासून बोलत आहेत. या संदर्भात हा पायलट प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील कामरेज परिसरातील चोर्यासी टोल प्लाझा येथे हा नवीन अडथळामुक्त टोल प्लाझा बसवण्यात आला आहे. तो सध्याच्या टोल प्रणालीची जागा घेईल, जिथे वाहनांना पैसे भरण्यासाठी थांबावे लागत होते.

Toll Plaza
Raj Thackeray Tweet on NCP President Post : ‘’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण..’’ ; राज ठाकरेंच्या ट्वीटने खळबळ

अडथळामुक्त टोल संकलन प्रणाली लागू झाल्यामुळे, वाहनचालकांना आता टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही किंवा रांगेत उभे राहावे लागणार नाही. वाहने गती कमी न करता टोलमधून जाऊ शकतील. यामुळे केवळ वेळ वाचणार नाही तर राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक पूर्वीपेक्षा खूपच सुरळीत होईल.

Toll Plaza
Amit Shah criticizes Mamata Banerjee : "मोमो फॅक्ट्रीत कोणाचे पैसे जमा होते?" ; अमित शहांचा ममता बॅनर्जींना खडा सवाल!

टोल कसा वसूल केला जाईल? -

ही नवीन प्रणाली ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR) तंत्रज्ञानाचा वापर करेल. हाय-रेझोल्यूशन कॅमेरे वाहनांच्या नंबर प्लेट स्कॅन करतील आणि FASTag शी संबंधित टोलची रक्कम आपोआप वजा केली जाईल. संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे संपर्करहित असेल, ज्यामध्ये कोणत्याही मॅन्युअल हस्तक्षेपाची आवश्यकता नाही. महत्त्वाचे म्हणजे, वाहने न थांबता ताशी 80 किलोमीटर वेगाने प्रवास करू शकतील.

Toll Plaza
Railway Toilet Incident Video : "गेट तोडा नाहीतर मी मरेन..." ; माजी मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार अडकले रेल्वेच्या शौचालयात!

तैवानच्या FETC एजन्सीचे २५ हून अधिक तज्ञ सप्टेंबरपासून या प्रकल्पावर काम करत आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, या प्रणालीच्या पूर्ण अंमलबजावणीमुळे वार्षिक सुमारे दीड हजार कोटींची इंधन बचत होईल आणि अंदाजे  सहा हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com