esakal | भारतातील नागरिक दीर्घायुषी; जगातील 200 देश आणि विविध भागात मृत्यूची 286 कारणे
sakal

बोलून बातमी शोधा

Indias life expectancy

‘लॅन्सेट’मधील लेखातील भाष्य; दशकभरात सरासरी आयुर्मान 70 वर्षांवर पोचले 

भारतातील नागरिक दीर्घायुषी; जगातील 200 देश आणि विविध भागात मृत्यूची 286 कारणे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतातील आयुर्मानात 1990 पासून वाढ झाली आहे. पण राज्याराज्यांत त्यात मोठी तफावत असल्याचे दिसून येते, असे ‘लॅन्सेट’ या नियतकालिकातील लेखात म्हटले आहे. जगातील 200 देश आणि विविध भागात मृत्यूची 286 कारणे आणि 396 रोगांचे विश्‍लेषण नव्‍या अभ्यासात करण्यात आले आहे. ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे की, भारतातील आयुर्मान 1990 मध्ये 59.6 वर्षांपर्यंत होते ते 2019 मध्ये 70.8 वर्षांपर्यंत वाढले आहेत. केरळमध्ये 77.3 वर्षांपर्यंत तर उत्तर प्रदेशमध्ये हे वयोमान 66.9 वर्षे हे आहे. देशात जगण्याची वय वाढले असले तरी नागरिक निरोगी आयुष्य जगताहेत, असे मात्र नाही. कारण त्यांना अनेक वर्षे आजारपण आणि अपंगत्व झेलावे लागते, अशी माहिती संशोधकांनी दिली. गांधीनगर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ’ या संस्थेतील श्रीनिवास गोली यांच्याही संशोधकांमध्ये समावेश आहे. 

मी तर सगळ्यांनाच भेटतो; खडसेंच्या पक्ष प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया​

आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या पथकाच्या मते सध्याच्या जागतिक संकटात आणि सार्वजनिक आरोग्याचा अभाव असताना उच्च रक्तदाब, तंबाखूचे सेवन आणि हवेचे प्रदूषण अशा धोक्यांमध्ये वाढ होत असल्याने कोरोनाव्हायरससारख्या आजारांना नागरिक बळी पडतात. यात भारतासह प्रत्येक देशात दिसलेली दिलासादायक बाब म्हणजे संसर्गजन्य रोगांमध्ये घट असून तुलनेने जुनाट व दीर्घकालीन आजार वाढत आहेत, असे या अभ्यासाचे सहलेखक व वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्रा. अली मोकदाद यांनी सांगितले. लसीकरण आणि चांगली वैद्यकीय सेवा यामुळे जगातील अनेक भागांत संसर्गजन्य रोग नियंत्रणात आणणे शक्य झाले आहे. मात्र काही देश अजूनही अशा जागतिक साथींशी लढा देत आहेत. 

Bihar Election : मोदी घेणार 12 प्रचारसभा; कोरोनावर मात करुन अमित शहाही मैदानात​

संशोधकांचे म्हणणे... 
- कोरोनाचा संसर्ग आणि गेल्या 30 वर्षांपासून वाढत असलेले दीर्घकालीन आजार यामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढते. 
- दक्षिण आशियाई देशांमध्ये संसर्गविरहित आजारांमुळे आयुष्याची निम्मी वर्षे अस्वास्थ, अपंगत्व आणि अकाली मृत्यूच्या प्रमाणात वाढ 
- आरोग्याच्या या समस्या 30 वर्षांपूर्वी संसर्गजन्‍य आजार, मातृक, नवजात अर्भक आणि पोषणातून उद्‍भवत असत. 
 
भारतात मृत्यूला कारणीभूत ठरणारे आजार व मृत्यूचे प्रमाण (2019मधील आकडेवारी) 

हवेचे प्रदूषण  16,70,000 

उच्च रक्तदाब  14,70,000

तंबाखू सेवन  12,30,000 

निकृष्ट आहार 11,80,000 
 

तीव्र मधुमेह 11,20,000