Indigo Airlines: इंडिगो विमानातील सीटचे कुशन चोरीला! तक्रार केली असता म्हणाले तुम्हीच शोधा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

कुशन चोरीला गेल्याच्या घटनेनंतर प्रवाशाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
Indigo Airlines: इंडिगो विमानातील सीटचे कुशन चोरीला! तक्रार केली असता म्हणाले तुम्हीच शोधा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Indigo Cushion Theft: आतापर्यंत तुम्ही विमानात सामान गहाळ झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. परंतु, नागपूरच्या रहिवासी सागरिका पटनायक यांना विमानात तिची अर्धी सीट गहाळ झाल्याचे आढळले.

सागरिका रविवारी पहाटे पुण्याहून नागपूरला (६ ई- ६७९८) इंडिगोच्या फ्लाइटने कामासाठी जात होती. तिचे पती, सुब्रत पटनायक यांनी सांगितले की, एअरलाइनने सागरिकाला खिडकीच्या बाजूचे सीट क्रमांक १० ए दिले. परंतु, जेव्हा ती सीटजवळ गेली तेव्हा तिला तिचे सीटवरील कुशन गहाळ असल्याचे दिसले.

सध्या या सीटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवासी महिलेचे नाव सागरिका असे सांगितले गेले. त्यांनी मागच्या रविवारी पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटचे (६ ई ६७९८) तिकीट बुक केले होते. सागरिकाला खिडकीच्या बाजूची सीट नंबर १० ए देण्यात आली होती. पण तिथे पोहोचताच सीटला कुशन नसल्याचे पाहून तिला आश्चर्य वाटले.

याबाबत सागरिकाने केबिन क्रूकडे तक्रार केली असता त्यांनी उलट महिलेलाच सीटच्या आजूबाजूला कुशनचा शोध घेण्यास सांगितले. तिने शोधाशोध केल्यानंतरही कुशन मिळाले नाही. यानंतर एकदा पुन्हा केबिन क्रूकडे विचारणा करण्यात आली. परंतु प्रतिसाद मिळाला नाही.(Latest Marathi News)

Indigo Airlines: इंडिगो विमानातील सीटचे कुशन चोरीला! तक्रार केली असता म्हणाले तुम्हीच शोधा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Uttarkashi Tunnel Rescue: मशीनपेक्षा वेगाने होतंय हाताने खोदकाम; बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचा व्हिडिओ आला समोर

इंडिगोकडून ही अपेक्षा नव्‍हती

या संपूर्ण प्रकरणावर सागरिका यांचे पती सुब्रत यांनी एअरलाइन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सांगितले की, इंडिगोसारख्या एअरलाइन्स कंपनीकडून अशी अपेक्षा नव्हती. विमान रवाना होण्यापूर्वी बोर्डिंगच्या आधी पूर्णत: तपासणीसाठी एक स्वच्छता पथक येत असते. परंतु, त्यांचे कुशनवर लक्ष गेले नाही. एवढेच नाही तर केबिन क्रू, जे विमानात सर्वप्रथम प्रवेश करतात, त्यांनाही हे दिसले नाही. तक्रार केल्यानंतर तरी समाधान होणे अपेक्षित होते.

इंडिगो एअरलाइन म्हणाले...

इंडिगोने सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर सांगितले की, हे निश्चितच योग्य नाही. कधी-कधी, सीट कुशन आपल्या वेल्क्रोपासून वेगळे होत असते. याला आमच्या चालक दलाच्या मदतीने पुन्हा लावले जाते. तुमची प्रतिक्रिया संबंधित टीमच्या लक्षात आणून दिली जाईल. (Latest Marathi News)

Indigo Airlines: इंडिगो विमानातील सीटचे कुशन चोरीला! तक्रार केली असता म्हणाले तुम्हीच शोधा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
आंतरराष्ट्रीय गँगस्टर अन् पोलिसांमध्ये गोळीबाराचा फिल्मी स्टाईल थरार, गायिकेच्या हत्येचा रचला होता कट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com