

Indigo Mess Leaves Groom Stranded on His Wedding Day
Esakal
इंडिगोचं वेळापत्रक कोलमडल्यानं सध्या देशभरातील विमानतळांवर मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. शेकडो विमानं रद्द झाल्यानं अनेक तास प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. यात कुणी जवळच्या नातेवाईकाच्या अंत्यदर्शनासाठी निघालंय तर कुणी अस्थी विसर्जनाला निघालंय. काही जण लग्नसमारंभाला जातायत तर काहींच्या परीक्षा, मुलाखती आहेत. पण इंडिगोने उड्डाणं रद्द केल्यानं प्रवासी हताशपणे विमानतळांवर बसले आहेत.