'ती'ची जिरवण्याच्या नादात पेटवली बिल्डींग; 7 मृत्यूचं कारण आलं समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire Accident

'ती'ची जिरवण्याच्या नादात पेटवली बिल्डींग; 7 मृत्यूचं कारण आलं समोर

इंदौर : मध्यप्रदेशमधील इंदौरमध्ये दोन दिवसांपूर्वी एका दुमजली रहिवाशी इमारतीला आग लागून दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या घटनेची पोलिसांनी चौकशी केली असून ही आग लागली नसून लावली असल्याचं तपासातून समोर आलंय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

या घटनेत आरोपी असलेल्या शुभम दीक्षित या तरुणाला अटक करण्यात आली असून पोलिसांच्या माहितीनुसार शुभम हा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून तो इंदौरमध्ये एका कंपनीत काम करतो. महिलेसोबत लग्न न झाल्याच्या बदल्यात त्याने हे कृत्य केल्याचं उघड झालं आहे. पोलिस तपासात सीसीटीव्ही चेक करत असताना पोलिसांनी त्याची ओळख पटवली आहे. आग लावणाऱ्या दीक्षित याला लोहामंडी येथून पकडण्यात आलं आहे. पोलिसांना बघून पळून जाण्याच्या तयारीत असताना पाठलाग करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हेही वाचा: इंदौरमध्ये पहाटे इमारतीला आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

स्वर्णबाग कॉलनीत आग लागलेल्या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेसोबत त्याचे संबंध होते. त्याला संबंधित महिलेशी लग्न करायचे होते पण त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता. या अगोदरही त्याचे त्या महिलेशी पैशांच्या कारणावरून भांडणं झाले होते असं पोलिसांनी सांगितलं आहे. सदर महिलेशी आपलं लग्न न झाल्याच्या कारणावरून त्याने याचा बदला घेण्याचं ठरवलं आणि या दुमजली इमारतीत राहणाऱ्या महिलेच्या गाडीला रात्रीच्या दरम्यान आग लावली. त्या आगीने नंतर रौद्र रुप धारण केलं आणि संपूर्ण इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून १० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आली असून सीसीटीव्ही मध्ये आरोपी गाडीला आग लावताना दिसत आहे असं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Indore Fire Accident 7 Death Cause Police Arrest

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :deathFire Accident
go to top