इंदौर ठरलं देशातील स्वच्छ शहर; सांगली, लोणावळा सासवडलाही पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदौर ठरलं देशातील स्वच्छ शहर

मध्य प्रदेशातील इंदौर या शहराने देशातील सर्वांत स्वच्छ शहर बनण्याचा मान मिळवला.

इंदौर ठरलं देशातील स्वच्छ शहर; सांगली, लोणावळा सासवडलाही पुरस्कार

मध्य प्रदेशची औद्योगिक राजधानी म्हणून इंदौर शहर ओळखले जाते. इंदौर शहरात दररोज 1200 टन कचरा निर्माण होतो, मात्र त्यानंतरही शहरात अस्वच्छता दिसून येत नाही. त्यामुळेच या शहराने सलग पाचव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान मिळवला आहे.

हेही वाचा: अदानी बंदरावर किरणोत्सारी कार्गो?

यावर्षी चे स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्कार 2021 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वच्छ शहरांना प्रदान करण्यात आला आहे. त्यामध्ये मध्य प्रदेशातील इंदौर या शहराने देशातील सर्वांत स्वच्छ शहर बनण्याचा मान मिळवला. आज (20 नोव्हेंबर) रोजी नवी दिल्लीमध्ये झालेल्या सोहळ्यात विजेत्या शहरांचा गौरव करण्यात आला आहे. यामध्ये गुजरातमधील सुरत शहर दुसरे, आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत स्वच्छ शहर ठरले आहे.

यावेळी स्वच्छ सर्व्हेक्षणात महाराष्ट्राचाही गौरव करण्यात आला आहे. 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशातील पहिले सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर सांगली जिल्ह्यातील विटा आहे. 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेले देशातील सर्वोत्कृष्ट दुसरे शहर म्हणजे लोणावळा. 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेले देशातील सर्वोत्कृष्ट तिसरे शहर म्हणजे सासवड. देशात स्वच्छता मोहिमेत महाराष्ट्र अव्वल असल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्यातील तीन शहरांनी पुरस्कार पटकवला आहे.

हेही वाचा: 'इम्रान खान मोठ्या भावासारखेच!' सिद्धूंच्या वक्तव्याने नवा वाद

त्याचबरोबर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वार्षिक स्वच्छता सर्व्हेक्षणात छत्तीसगड हे भारतातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच सर्वात स्वच्छ गंगा शहराच्या श्रेणीत वाराणसीला पहिले स्थान मिळाले आहे. सर्वात स्वच्छ गंगा शहराच्या श्रेणीत यूपीच्या वाराणसीला पहिले स्थान मिळाले आहे. गुजरातमधील सुरत आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा या शहरांना देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर बनण्याचा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, 'देशवासीयांच्या विचारसरणीत बदल हे स्वच्छ भारत अभियानाचे मोठे यश आहे. आज हा बदल मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून आला आहे.

loading image
go to top