आणखी एक वेबसाईट ब्लॉक करण्याचे केंद्राचे आदेश

 information and broadcast ministry order to block one website in punjab
information and broadcast ministry order to block one website in punjabe sakal

नवी दिल्ली : केंद्राने आणखी एका विदेशी वेबसाईटला ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. ''पंजाब पॉलिटिक्स टीव्ही''चे सर्व अॅप्स, सोशल मीडिया अकाऊंट्स आणि वेबसाईट ब्लॉक करणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं (Information And Broadcast Ministry) म्हटलं आहे. सामाजिक शांतता भंग करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

 information and broadcast ministry order to block one website in punjab
भारताकडून आणखी ५४ अ‍ॅप्सवर बंदी; चिनी अ‍ॅप्सचाही समावेश

सध्या पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. यादरम्यान ''Punjab Politcs TV'' हे चॅनेल राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी माहिती प्रसारीत करत आहे, अशी माहिती इंटलिजन्सकडून मिळाली. त्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं आयटी कायद्याअंतर्गत या मीडियाचे सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत, असं केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी भारत सरकारने ५४ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. देशाचा सुरक्षेला धोकादायक ठरत असल्याने सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चिनी अ‍ॅप्सचासुद्धा समावेश होता. नव्या बंदी घातलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत आधी बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. मात्र ते क्लोन स्वरुपात पुन्हा समोर आले होते. २०२० नंतर देशात एकूण २७० अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने ५० आणखी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ ए अंतर्गत या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com