भारताची 'INS वेला', आता समुद्राखालून होणार घातक वार | Indian navy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Submarine

भारताची 'INS वेला', आता समुद्राखालून होणार घातक वार

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई:भारतीय नौदलात (Indian navy) आज 'INS वेला' ही स्कॉर्पियन वर्गातील ( Scorpene class submarine) पाणबुडी दाखल झाली. 'INS वेला'मुळे भारतीय नौदलाची युद्धक्षमता कैकपटीने वाढली आहे. प्रोजेक्ट ७५ वर्गातील हा पाणबुडी असून अशा सहा पाणबुड्या बांधल्या जाणार आहेत. समुद्री युद्धाबरोबरच माहिती गोळा करणं, समुद्रात सुरुंग पेरणं आणि टेहळणी अशा वेगवेगळ्या बहुउद्देशीय मोहिमा पार पाडण्यात INS वेला सक्षम आहे. प्रोजेक्ट ७५ वर्गातील कलवरी, खांदेरी आणि करंज या पाणबुड्या आधीच रुजू झाल्या आहेत.

जाणून घ्या 'INS वेला'ची क्षमता

- नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांच्या उपस्थितीत INS वेलाचे जलावतारण झाले.

- मुंबई स्थित माझगाव डॉकमध्ये फ्रान्सच्या M;/S नेव्हल ग्रुप ऑफ मदतीने INS वेलाची बांधणी करण्यात आली आहे.

- अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या INS वेलाकडे स्टेल्थ क्षमता आहे. स्टेल्थ टेक्नोलॉजीमुळे शत्रुच्या रडारला चकवता येते.

हेही वाचा: एक डिसेंबरपासून राज्यात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा होणार सुरू

- आयएनएस वेलाचा आधीचा अवतार असलेली पाणबुडी ३१ ऑगस्ट १९७३ रोजी सेवेत दाखल झाली होती. ३७ वर्षानंतर २५ जून २०१० रोजी ही पाणबुडी सेवेतून निवृत्त झाली होती.

- समुद्राच्या पुष्ठभागावर किंवा आतमध्ये टॉरपीडो आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी एकाचवेळी INS वेलामधुन हल्ला करता येऊ शकतो.

हेही वाचा: माजी पोलीस कमिशनर परमबीर सिंह मुंबईत दाखल

- मे २०१९ मध्ये लाँच झालेल्या आयएनएस वेलाच्या बंदर आणि समुद्रातील शस्त्रास्त्रांसह सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

- या वर्गातील पहिली पाणबुडी INS कलवरी ऑक्टोबर २०१५ मध्ये लाँच झाली. २०१७ पासून ही पाणबुडी सेवेत आहे. आयएनएस खांदेरी जानेवारी २०१७ मध्ये लाँच झाली. सप्टेंबर २०१९ मध्ये ही पाणबुडी सेवेत दाखल झाली. आयएनएस करंज जानेवारी २०१८ मध्ये लाँच झाली आणि १० मार्च २०२१ ला सेवेत दाखल झाली. आयएनएस वेला चौथी पाणबुडी आहे.

loading image
go to top