esakal | भाजी विकून दहावी बोर्डाच्या परीक्षेत मिळवला राज्यात प्रथम क्रमांक
sakal

बोलून बातमी शोधा

Inspiring Tale Of A Farmer's Son Who Sold Vegetables To Become Bihar Board Class 10 Topper

बिहार राज्यातील दहावीच्या परीक्षांचा निकाल लागला असून, हिमांशू राज नावाचा विद्यार्थी राज्यात प्रथम आला आहे. 

भाजी विकून दहावी बोर्डाच्या परीक्षेत मिळवला राज्यात प्रथम क्रमांक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पटना : बिहार राज्यातील दहावीच्या परीक्षांचा निकाल लागला असून, हिमांशू राज नावाचा विद्यार्थी राज्यात प्रथम आला आहे. तर ८०.५९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. रोहतास येथील हिमांशू राजने परीक्षेत ४८१ गुणांसह ९६.२० टक्के मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकवला. संपूर्ण राज्यात १५ लाख विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी १२ लाख ४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हिमांशूच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून, त्याचे वडील शेतकरी आहेत. हिमांशू दिवसातून १४ तास अभ्यास करत असे. यावेळी हिमांशूचे वडील त्याचा अभ्यास घेत असल्याचे हिमांशूने सांगितले. अनेकदा घरातील आर्थिक घडी बिघडल्यानंतर देखील आपण अभ्यास चालूच ठेवल्याने हे यश मिळाल्याचे हिमांशू पुढे सांगितले. हिमांशूचे वडील शेतीचा भाग उसनवारीने घेऊन शेती करतात. आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी हिमांशू बाजारात जाऊन भाजी विकून आर्थिक हातभार लावत असे. हे सर्व करत असताना अभ्यासात कोणताही खंड पडू न दिल्यानेच प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे हिमांशू म्हणतो. तसेच भविष्यात आणखी मेहनत करून हिमांशूला सॉफ्टवेयर इंजीनियर बनायचे आहे. 
-----
पिंपरीतील अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार
-------
भारत-चीन तणाव वाढला! मोदींनी घेतली तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची भेट
-------
दरम्यान, पहिल्यांदाच बिहार राज्यातील दहावीच्या बोर्ड परीक्षांचा निकाल शिक्षण विभागाने लावलेला आहे. तर यंदाचा निकाल हा तांत्रिक दृष्ट्या सर्वोत्तम असल्याचे बिहारच्या शिक्षण बोर्डाने म्हटले आहे. तसेच यावेळी प्रलंबित निकालांची संख्या देखील कमी असल्याचे बोर्डाने सांगितले. मागील काही दिवसांपासून विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते. त्यानंतर आज दुपारी बोर्डाने निकाल जाहीर केले. 

खाली दिलेल्या या वेबसाईट्स वर जाऊन आपण निकाल बघू शकता - 
www.biharboardonline.bihar.gov.in , onlinebseb.in