बंगालमधील कोरोना केंद्रे बंद न करण्याचे निर्देश

श्‍यामल रॉय
Saturday, 10 October 2020

पश्‍चिम बंगालमध्ये दुर्गापूजेचे वेध लागले असून, या उत्सवी काळात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती असल्याने दूरस्थ कोरोना उपचार केंद्रे बंद न करण्याचे निर्देश राज्य सरकारने खासगी रुग्णालयाला शुक्रवारी दिले.

कोलकता - पश्‍चिम बंगालमध्ये दुर्गापूजेचे वेध लागले असून, या उत्सवी काळात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती असल्याने दूरस्थ कोरोना उपचार केंद्रे बंद न करण्याचे निर्देश राज्य सरकारने खासगी रुग्णालयाला शुक्रवारी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांच्या निवाऱ्यासाठी अनेक खासगी रुग्णालयाने हॉटेलबरोबर करार केले आहेत. या हॉटेलमधील वास्तव्यासाठी भरमसाठ शुल्क आकारले जात असल्याने येथील बहुतांश दूरस्थ कोरोना केंद्र रिकामीच आहेत. 

चारा घोटाळा - लालूंना जामीन मंजूर; मुक्काम मात्र तुरुंगातच

या केंद्रात एका दिवसासाठी तीन ते नऊ हजार शुल्क आकारले जाते. यात डॉक्टरांचे शुल्क, औषधांचा खर्च आणि भोजन सेवेचा समावेश आहे. सरकारी रुग्णालयातील यासाठी अत्यंत माफक शुल्क आकारले जाते. 

दुर्गापूजेची तयारी, मंडप उभारण्याची लगबग, खरेदी यामुळे गर्दी होत असल्याने कोलकतामधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गुरुवारी (ता. ८) एका दिवसात ७६५ रुग्ण आढळले होते. 

राहुल गांधींनी शेअर केला मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडिओ

मेट्रो सेवा मर्यादित स्वरूपात सुरू झाली असली तरी त्‍यामुळे शहरात संसर्ग वाढ होऊ लागल्याचे दिसत आहे. त्यातच दुर्गापूजेच्या आधी उपनगरी सेवा सुरू झाल्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instructions not to close Corona centers in Bengal