esakal | आयएनआय सीईटी पुढे ढकलण्याचे निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

आयएनआय सीईटी पुढे ढकलण्याचे निर्देश

आयएनआय सीईटी पुढे ढकलण्याचे निर्देश

sakal_logo
By
सागर शेलार

नवी दिल्ली ः अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून (एम्स) पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘आयएनआय सीईटी- २०२१’साठी १६ जून ही तारीख निश्‍चित करणे हा मनमानीपणा असल्याचे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने आज ही परीक्षा एक महिन्यानंतर घेण्याचे निर्देश ‘एम्स’ला दिले आहेत.

हेही वाचा: परमबीर यांचा पोलिसांवर विश्‍वास नसणे धक्कादायक : सर्वोच्च न्यायालय

न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. एम.आर. शहा यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली. या संदर्भातील पूर्वीच्या तारखेला आव्हान देणारी याचिका काही डॉक्टरांनी सादर केली होती. उमेदवारांना सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्या आम्ही जाणून घेतल्या आहेत. अनेक डॉक्टर हे कोरोनाच्या ड्युटीवर असल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर पोचणे अवघड होते, त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलणे गरजेचे आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. एम्सकडून ८१५ जागांवरील प्रवेशासाठी तब्बल ८० हजार उमेदवारांनी अर्ज केले होते.

हेही वाचा: जगाला एक अब्ज डोस पुरविणार : बोरीस जॉन्सन