Rabindranath Tagore Birth Anniversary: जेव्हा रवींद्रनाथ टागोरांचं नोबेल पारितोषिक चोरीला गेलं... वाचा किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rabindranath Tagore

जेव्हा रवींद्रनाथ टागोरांचं नोबेल पारितोषिक चोरीला गेलं.. वाचा किस्सा

जगप्रसिद्धकवी, शिक्षणतज्ज्ञ, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, संगीतकार अशी अनेक क्षेत्रात ख्याती असणारे नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांची आज जयंती. रवींद्रनाथ टागोर यांची १६२ वी जयंती रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 साली कोलकात्यात एका संपन्न कुटुंबात झाला.

रवींद्रनाथांनी बॅरिस्टर व्हावं. अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांना 1878 साली ब्रिटनला पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना पाश्चिमात्य संगीत आणि नृत्य तसेच अन्य कलांचा अविष्कार पाहायला मिळाला. त्यानंतर ते भारतात परतले. लहानपणापासून रवींद्रनाथ टागोर कविता आणि कथा लिहायचे. रवींद्रनाथ टागोर यांनी साहित्यामध्ये दोन हजारांहून अधिक रचना केल्या आहे. (interesting facts about rabindranath tagore on the occasion of his birth anniversary)

हेही वाचा: चक्क हातगाड्यावर नेली Mahindra कार; आनंद महिंद्रांनी सांगितला किस्सा

रवींद्रनाथ टागोर यांचे आयुष्य खुपच रोमांचक होते. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग, घटना अनेक पुस्तकात लिहील्या आहेत. त्यातील या तीन घटना -

1. जेव्हा रवींद्रनाथ टागोरांचे नोबेल पारितोषिक चोरीला गेले

रवींद्रनाथ टागोर यांना 'गितांजली' या महाकाव्यासाठी 1913 सालचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. साहित्यात नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय होते. हा पुरस्कार विश्व-भारती विश्वविद्यालयाच्या संरक्षणाखाली ठेवण्यात आला होता. मात्र 2004 मध्ये नोबेल पारितोषिकची चोरी झाली होती. त्यानंतर स्वीडिश अकादमीने विश्व-भारती विश्वविद्यालयाला नोबेल पुरस्काराच्या दोन प्रतिकृती दिल्या. त्यातील एक सोन्याची आणि दुसरी पितळेची आहे.

हेही वाचा: मासिक पाळीत पोट दुखतयं? हे पाच उपाय ट्राय करा

2. जेव्हा रवींद्रनाथ टागोर अल्बर्ट आइंस्टीन यांना भेटले

रवींद्रनाथ टागोर हे एक प्रसिद्ध विचारवंत आहे ज्यांच्याबद्दल जगभरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवले जाते एकदा रवींद्रनाथ टागोर महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइंस्टीन यांना भेटले. रवींद्रनाथ टागोर आणि अल्बर्ट आइंस्टीन या दोघांनीही बैठकीत देव, मानवता, विज्ञान, सत्य आणि सौंदर्य यावर चर्चा केली. या दोन महान विद्वानांचे संभाषणही अनेक पुस्तकांमध्ये लिहिलेले आहे.

हेही वाचा: देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोय; तीन हजारहून नव्या रुग्णांची नोंद

3. जेव्हा रवींद्रनाथ टागोर बेनिटो मुसोलिनीला भेटले

रवींद्रनाथ टागोर 1926 मध्ये इटलीला गेले. जिथे त्यांनी रोममध्ये इटलीचे पंतप्रधान बेनिटो मुसोलिनी यांची भेट घेतली. राजकीय विचार मांडणारे रवींद्रनाथ टागोर आणि मुसोलिनी यांची भेट अनेक देशांसाठी चिंतेचा विषय बनली होती. मात्र, या बैठकीत काहीही नकारात्मक चर्चा झाली नाही.

Web Title: Interesting Facts About Rabindranath Tagore On The Occasion Of His Birth Anniversary

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top