मासिक पाळीत पोट दुखतयं? हे पाच उपाय ट्राय करा

मासिक पाळी दरम्यान वेदना होत असतील तर खालील पाच उपाय करा
मासिक पाळी
मासिक पाळी sakal

मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीसाठी अत्यंत वेदनादायक असते आणि ही नाकारता येणार नाही. मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना अस्वस्थता आणि त्रास जाणवणे खुप सामान्य आहे. मात्र प्रत्येक स्त्रीच्या वेदना भिन्न असू शकतात.

जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील इतर महिलांना दर महिन्याला मासिक पाळी दरम्यान शारीरीक आणि मानसिक वेदना होत असतील तर तुम्ही यासाठी विविध घरगुती उपाय करु शकता. खालील पाच उपाय करा ज्यामुळे नक्कीच वेदनामुक्त होणार. (Try five home remedies to relieve menstrual cramps)

१. योगा करा

योगा तुम्हाला मासिक पाळीच्या त्रासाचा सामना करण्यास मदत करू शकतो. अशी अनेक आसन आणि योगा आहेत जी तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यान करू शकता. ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होईल. गोमुखासन, भुजंगासन आणि शीर्षासन ही अशी काही आसने आहेत ज्याद्वारे तुम्ही वेदना कमी करण्याचा प्रयत्न करू शकता.

मासिक पाळी
cholesterol कमी करायचा? उपाशी पोटी घ्या एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस

२. भिजवलेले मनुके आणि केशर

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी हा सर्वात प्रभावी घरगुती उपाय आहे. तुम्हाला फक्त 3-4 मनुके भिजवायचे आहेत आणि सकाळी प्रथम ते केशर सोबत घ्या.

३. केळी

केळी खाल्ल्याने आरोग्याला भरपूर फायदे होतात. सोबतच केळी पाळीच्या दुखण्यावर देखील मदत करते केळीमध्ये जीवनसत्त्व बी-6 आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.

मासिक पाळी
तुम्ही फ्रिजमधील थंड पाणी पिता का? हार्ट रेट कमी होऊ शकतो

४. गरम पाण्याची बाटली

उष्णता लागू केल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. थोडा आराम मिळवण्यासाठी तुम्ही हीटिंग पॅड,उबदार टॉवेल किंवा तुम्ही गरम पाण्याची बाटली दुखण्याच्या ठिकाणी ठेवत आराम मिळवू शकता. गरम पाण्याने आंघोळ केल्याने देखील वेदनेपासून आराम होऊ शकतो.

५. डार्क चॉकलेट

थोडेसे डार्क चॉकलेट घेतल्याने मासिक त्रासापासून आराम मिळतो. डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम असते जे स्नायूंना आराम करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com