esakal | लहानपणापासून एकत्र असलेले आयपीएस दाम्पत्य आता...
sakal

बोलून बातमी शोधा

Noida

घरात बॉस असलेली पत्नी आता नोकरीच्या ठिकाणी बॉसच राहणार असल्याची घटना आयपीएस अधिकारी अंकुर अग्रवाल यांच्याबाबत घडली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ आणि नोएडामध्ये नवे पोलिस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर एका आयपीएस दाम्पत्याची चर्चा सुरु आहे.

लहानपणापासून एकत्र असलेले आयपीएस दाम्पत्य आता...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनौ : लहानपणापासून आयपीएस अधिकारी होईपर्यंत एकमेकांना साथ देणाऱ्या जोडप्यावर आता अजब वेळ आली आहे. पोलिस उपायुक्त (डीसीपी) झालेल्या पत्नीला अतिरिक्त पोलिस आयुक्त (एडीसीपी) असलेल्या तिच्या पतीला रिपोर्टिंग करावे लागणार आहे. या दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या जोडीची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घरात बॉस असलेली पत्नी आता नोकरीच्या ठिकाणी बॉसच राहणार असल्याची घटना आयपीएस अधिकारी अंकुर अग्रवाल यांच्याबाबत घडली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ आणि नोएडामध्ये नवे पोलिस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर एका आयपीएस दाम्पत्याची चर्चा सुरु आहे. नोएडा पोलिस आयुक्तालयात आयपीएस वृंदा शुक्ला यांची उपायुक्तपदी तर त्यांचे पती आयपीएस अंकुर अग्रवाल यांची अतिरिक्त उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

नाइट लाइफ... अंधारातले, उजेडातले

अंकुर अग्रवाल आणि वृंदा शुक्ला हे दोघेही मुळचे हरियानातील आहेत. ते दोघे लहानपणापासून मित्र आहेत. दोघांनी लहानपणी ‘अंबाला कॉन्व्हेंट जिजस अॅण्ड मेरी स्कूल’ या शाळेत एकत्र शिक्षण घेतले. त्यानंतरचे शिक्षणही एकाच महाविद्यालयात पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंकुर आणि वृंदा दोघी परदेशात नोकरीसाठी गेले. तिथे त्यांनी काही दिवस खासगी नोकरी केली. त्यानंतर ते पुन्हा भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि आयपीएस अधिकारी झाल्यानंतर लग्न केले. वृंदा शुक्ला यांना दुसऱ्या प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत यश आले. 2014 साली त्या आयपीएस अधिकारी झाल्या आणि नागालँडला त्यांची नियुक्ती झाली. त्यांचे पती अंकुर अग्रवाल यांना 2016 साली यश आले आणि त्यांची बिहारला नियुक्ती झाली होती. पण, आता हे दाम्पत्य पुन्हा एकत्र आले असून, त्यांच्यावर नोएडाची सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. 

loading image
go to top