Viral: आयपीएस मुलानं पैशांसाठी घराबाहेर काढलं! अधिकाऱ्याच्या आईची व्यथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral News

Viral: आयपीएस मुलानं पैशांसाठी घराबाहेर काढलं! अधिकाऱ्याच्या आईची व्यथा

IPS Officer Mother video viral: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची काही कमी नाही. त्यातून नेटकऱ्यांचे मनोरंजन तर होतेच. याशिवाय त्यांनी नवनवीन गोष्टी देखील त्यातून कळतात. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमधून अनेकदा धक्कादायक प्रसंगही समोर आल्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले जाते. अशाच एका व्हिडिओनं नेटकऱ्यांना धक्का दिला आहे.

काही दिवसांपूर्वी भोपाळमध्ये राहणाऱ्या शैलेश सिंग यांच्या मोठ्या भावानं भोपाळ पोलीस आयुक्तांना एक निवेदन दिले होते. त्यामध्ये त्यांनी शैलेश यांच्यावर संपत्तीचा दुरुपयोग करुन ती हडपल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. यामुळे चर्चेत आलेल्या शैलेश सिंग यांची सोशल मीडियावर मोठी बदनामी झाली होती. प्रॉपर्टीवर कब्जा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आता एम पी पोलीसचे स्पेशल डीजी शैलेश सिंग यांची आई कैलाशी सिंग यांनी केलेला धक्कादायक आरोप समोर आला आहे.

हेही वाचा: Aishwarya Rai birthday: 'पत्रकार आहेस शिस्तीत राहा'! 'तो' प्रश्न ऐश्वर्याला राग अनावर

त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कैलाशी सिंग यांनी आपल्या आयपीएस मुलावर प्रॉपर्टीच्या संबंधात आरोप केले आहेत. कैलाशी सिंग या आता 90 वर्षांच्या आहेत. त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल करुन त्यामध्ये आपला मुलगा आपल्याकडे पैसै मागतो, त्यानं आमच्याकडून पाच लाख रुपये घेतले आहेत. आम्ही जिथे राहतो तिथून तो आम्हाला हकलून लावत असल्याचा आरोप कैलासी यांनी केला आहे. या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

हेही वाचा: Swara Bhasker: 'याच्यापेक्षा मोठं...' ट्रोलर्सला उत्तर देताना स्वरा भलतचं बोलली

कैलासी सिंग यांनी हात जोडून आता सरकारकडे मदतीची याचना केली आहे. त्यामुळे भोपाळचे डीजी शैलेश सिंग हे कौटूंबिक वादात सापडल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या आईनं केलेले आरोप चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं तर खळबळ उडवून दिली आहे.

हेही वाचा: Video: माकडाचा 'नशापाणी'; पितंय चक्क पेट्रोल