IRCTC Food : रेल्वे प्रवासात जेवण झालं महाग, जाणून घ्या सविस्तर

रेल्वेने आपल्या पँट्री कारद्वारे मिळणाऱ्या किमतींमध्ये वाढ केली आहे.
IRCTC Food
IRCTC Food esakal

IRCTC Increased Food Rate : लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशींसाठी वाईट बातमी आहे. कारण दूरवरच्या प्रवासासाठी त्यांना वाटेत जेवण करणं आवश्यक असतं. अशावेळी रेल्वे यंत्रणेने पँट्रीमधल्या जेवणाच्या किमती वाढवल्याने या महागाईचा फटका प्रवाशांना बसणार आहे. आयआरसीटीसीने प्रत्येक पँट्री कारमध्ये मिळणाऱ्या पदार्थांच्या किंमती वाढवल्या आहेत. पूर्व मध्य रेल्वेने आपले क्षेत्राधिकारातून जाणाऱ्या गाड्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वेतल्या जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी सुधारल्यामुळे इथल्या पदार्थांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे पदार्थांमध्ये वैविध्य आणलं जाणार आहे. यात चपाती, भाजी, डोसा, सँडविच सहित सर्व पदार्थ महाग झाले आहेत.

IRCTC Food
Indian Railway : PNR टाका अन् व्हॉट्सअपवरून मागवा जेवण; वाचा काय आहे IRCTC ची योजना

रेल्वेत जेवण महागलं

आयआरसीटीसीने ट्रेनमध्ये मिळणारं जेवणाचे दर वाढवले असले तरी, स्टेशनवर मिळणाऱ्या फूड स्टॉल्सच्या किंमती मात्र तशाच ठेवल्या आहेत, ही आनंदाची बाब आहे. पूर्व मध्य रेल्वेने जाणाऱ्या सर्व गाड्यांमधलं जेवण साधारण २ ते २५ रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळे दर वाढवण्यात आले आहेत. आयआरसीटीसीने ७० वस्तूंची लिस्ट दिली आहे. ज्याचे रेट बदलवण्यात आले आहेत.

IRCTC Food
Nashik News : IRCTC ‘बजेट हॉटेल्स’ ला नाशिकमध्ये जमीन उपलब्ध करावी; भुजबळांची मागणी

किती महागलं आहे जेवण

  • समोसा - ८ वरुन १० रुपये,

  • सँडविच - १५ वरुन २५ रुपये,

  • बर्गर - ४० वरुन ५० रुपये,

  • ढोकळा (१०० ग्रॅम) - २० वरुन ३० रुपये,

  • ब्रेड पकोडा - १० वरुन १५ रुपये,

  • बटाटे वडा - ७ वरुन १० रुपये,

  • मसाला डोसा -४० वरुन ५० रुपये,

  • चपाती (रोटी) - ३ वरुन १० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com