IRCTC : तत्काळ तिकिटासाठी 'कन्फर्म तिकीट' अ‍ॅप लाँच

अ‍ॅपवर प्रवाशांसाठी तत्काळ कोट्यात उपलब्ध जागांची माहिती मिळणार आहे.
IRCTC
IRCTC sakal media

नवी दिल्ली : तत्काळ तिकिटांसाठी धावाधाव (Railway Ticket) करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वेतर्फे तत्काळ तिकिटांसाठी नवीन अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. 'कन्फर्म तिकीट' या नावाने हे अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. रेल्वेतर्फे लाँच करण्यात आलेल्या अ‍ॅपवर प्रवाशांना ट्रेनसाठी तत्काळ कोट्यात उपलब्ध असलेल्या जागांची माहिती मिळणार आहे. (IRCTC Confirm Ticket App For Tatkal Booking)

याशिवाय रेल्वेचा नंबर (Railway Number) टाकूनदेखील प्रवाशांना इतर रेल्वेगाड्यांमधील रिक्त सीट किती आहेत याची माहिती घेऊ शकणार आहेत. प्रवाशांचा मौल्यावान वेळ वाया जाऊ नये यासाठी अ‍ॅपमध्ये तिकीट बुकिंगसाठी मास्टर लिस्टदेखील (Railway Master List) देण्यात आली आहे. प्रवासी सकाळी 10 वाजल्यापासून तत्काळ तिकीट बुक करू शकणार आहेत. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) तसेच IRCTC नेक्स्ट जनरेशन मोबाइल अ‍ॅपवरूनही डाउनलोड करू शकणार आहे. रेल्वेच्या या नव्या उपक्रमामुळे सर्वसामान्य प्रवाशांची सोय होणार असून, कुठल्याही धावपळीशिवाय घरबसल्या तिकिट काढता येणार आहे.

IRCTC
Whether Forecast : यंदा मॉन्सून सामान्य राहणार; स्कायमेटचा अंदाज

रेल्वेची नवी पेमेंट सेवा

रेल्वे प्रवाशांसाठी फायद्याची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक नवीन सुविधा सुरू केली असून, आता प्रवाशांना क्यूआर कोड (QR Code) आणि यूपीआय पेमेंटद्वारे (UPI Payment) ट्रेनचे तिकीट सहज खरेदी करता येणार आहे. यामुळे सुविधेमुळे आता प्रवाशांना तिकीट काढणे अधिक सोपे होणार आहे. ही सुविधा ज्या ठिकाणी ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन (ATMV) सुविधा आधीपासून अस्तित्वात आहे अशाच स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

IRCTC
ABG Shypyard : माजी संचालक ऋषी अग्रवाल चौकशीसाठी CBI मुख्यलयात

वाढत्या ऑनलाइन सेवा पाहता रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे. (Train Tickets Can Booked Through QR Code) ज्यावेळी तुम्ही या मशीनच्या सहाय्याने तिकीट काढण्यासाठी जाल त्यावेळी तुम्हाला मशीनवर एक QR कोड फ्लॅश होताना दिसेल, तो तुम्हाला स्कॅन करावा लागेल. तिकिटाचे पैसे तुम्ही कोणत्याही UPI अ‍ॅपच्या मदतीने देऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com