युपीतल्या मतदानाची 'इस्लामाबाद' मध्ये आतुरता; रंजक आहे कारण | UP Assembly Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

voting

युपीतल्या मतदानाची 'इस्लामाबाद' मध्ये आतुरता; रंजक आहे कारण

इस्लामाबाद : उत्तर प्रदेश विधानसभेच्या (UP Election 2022 ) निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून येथील राजकीय (Politics) वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचारामध्ये अनेक राजकीय पक्ष एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्याचे काम करत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 'इस्लामाबाद'चे मतदार (Voter) आतुरतेने वाट बघत आहेत. येथे 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. (UP Assembly Election 2022)

हेही वाचा: मोदींनी विचारलं खरंच तुमचं वय 55 आहे का? मिलिंद सोमणने दिलं उत्त

वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. पण हे इस्लामाबाद (Islamabad) भारताच्या शेजारील देश पाकिस्तानातील (Pakistan) नसून बिजनौर जिल्ह्यातील एक गाव आहे आणि बर्हापूर विधानसभा मतदारसंघांतर्गत येते, (Barhapur Assembly constitution) जेथे 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. बिजनौर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असून या गावाची लोकसंख्या सुमारे दहा हजार इतकी आहे. दरम्यान, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही इस्लामाबाद हे गावचे नाव इथल्या लोकांना अस्वस्थ करत नाही. तर, येथील लोक आनंदाने आपल्या गावाचे नाव घेतात आणि त्याचा अभिमान बाळगतात.

हेही वाचा: भाजपकडून ९९ गुन्हेगारांना तिकीट; अखिलेश यादव यांची खरमरीत टीका

नावाचा इतिहास माहिती नाही

'या गावाचे नाव इस्लामाबाद कसे पडले हे मला माहीत नाही, परंतु मी हे नाव लहानपणापासून ऐकत आलो आहे आणि माझ्या पणजोबांच्या काळापासून प्रचलित आहे, असे इस्लामाबाद गावाचे प्रमुख सर्वेश देवी यांचे पती विजेंदर सिंह यांनी सांगितले. (Islamabad Village In India)

हेही वाचा: "मोदींपेक्षा मोठा हिंदू कोण, याचीच योगी-अखिलेशमध्ये स्पर्धा"

गावाचे नाव तेच राहील

शेजारील देश पाकिस्तानची राजधानीच्या नावाप्रमाणेच गावाच्या नावाने गावकऱ्यांमध्ये कधी भीती किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे का? असे विचारले असता विजेंदर सिंग म्हणाले की, “गावाच्या नावामुळे गावकऱ्यांमध्ये कधीच असुरक्षिततेची भावना आली नाही किंवा असा विचारही आमच्या मनात आला नाही. त्यामुळे गावाचे हेच नाव कायम राहील.

गावात आहेत इतके मतदार

हे गाव जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 40 किमी अंतरावर असून, या गावची लोकसंख्या 10,000 इतकी आहे, त्यापैकी 4700 मतदार आहेत. गावातील वडिलधाऱ्यांनी गावाचे नाव बदलण्याचा विचार कधीच केला नव्हता आणि या संदर्भात कधीही अर्जही केला नसल्याचे सिंग यांनी सांगितले. (Islamabad Village Population)

गावातील मुस्लिमांची संख्या 300 ते 400

गावचे प्रमुख सर्वेश देवी यांनी सांगितले की, गावातील तरुण जे जिल्हा मुख्यालयी किंवा इतर ठिकाणी कामासाठी जातात, त्यांना गावाच्या नावाबाबत कधीही अडचण आली नाही. गावात राहणाऱ्या लोकसंख्येवर प्रकाश टाकत प्रधान म्हणाले की, 'गावात चौहान, प्रजापती आणि मुस्लिम राहतात आणि सर्व लोक शांततेत राहतात. गावात मुस्लिमांची लोकसंख्या 300-400 आहे. गावातील लोक ऊस, गहू, भात, भुईमूग यासह इतर पिके घेतात असे ते म्हणाले.

तीन कृषी कायद्यांमध्ये गावातील लोकांचा सहभाग

येथील नागरिकांनी तीन कृषी कायद्यांच्या विरोधात निषेध नोंदविला होता तसेच त्यांनी आंदोलक शेतकर्‍यांना पाठिंबा देखील दिला होता. निवडणूक कोणत्या दिशेने जाईल, असे विचारले असता ते म्हणाले की, येथे भाजप, सपा आणि बसपा यांच्यातच लढत आहे. गावातील जनता विकासासाठी मतदान करणार असल्याचे सिंह यांनी ठणकावून सांगितले. मुख्य रस्त्यांची अवस्था ठीक आहे, पण गावात आत कच्चे रस्ते आहेत, ते पक्के करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील मुलींच्या शिक्षणासाठी इंटर कॉलेजची गरज असल्याचे ते म्हणाले. मात्र, यासाठी आम्हाला कोणाकडूनही आश्वासन मिळालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

नाव बदलण्याबाबत कोणतीही चर्चा नाही

गावाचे नाव बदलण्यासाठी गावातील तरुणांनी कधी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्याचा विचार केला आहे का? असे विचारले असता ते म्हणाले, हा आमच्यासाठी कधीच चर्चेचा विषय राहिला नाही, ना निवडणुकीचा मुद्दा. आम्ही या गावात अनेक पिढ्यांपासून राहत आहोत, इस्लामाबाद हे गाव त्याच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे आणि गावातील सर्व रहिवासी त्याचे नाव अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेतात, असेही येथील नागरिकांनी सांगितले

Web Title: Islamabad People Eagerly Waiting For A Vote In Up Assembly Election 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top