

crude oil tanker missile attack kolapur youth
esakal
Israel Iran war : इस्त्राईल-इराण युद्धात क्रूड ऑईल घेऊन जाणाऱ्या एका जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाला. या जहाजावर अभियंता असलेल्या कसबा बावड्यातील रोहित राजेंद्र पाटील हा तरुण सुखरूप आहे. त्याचा कुटुंबीयांशी संपर्क झाला असून, तो ज्या कंपनीत काम करत आहे, त्या कंपनीकडून रोहितसह अन्य कर्मचाऱ्यांना बहरीन येथे सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.