छत्तीसगडमध्ये जवानाचा अंदाधुंद गोळीबार; सहा जवान ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 4 डिसेंबर 2019

 छत्तीसगडमध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या छावणीत एका जवानाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच जवान ठार झाले. त्यानंतर त्या जवानाने स्वतःला गोळी घालून घेतली.

रायपूर (छत्तीसगड) :  छत्तीसगडमध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या छावणीत एका जवानाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच जवान ठार झाले. त्यानंतर त्या जवानाने स्वतःला गोळी घालून घेतली. या घटनेत आणखी दोन जवान जखमी झाले असून, त्यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात हालवण्यात आले आहे. घटनेतील मृतांची संख्या सहा झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

घटनेबाबत आतापर्यंत मिळालेली माहिती अशी, की छत्तीसगडमधील नारायणपूर येथे आयटीबीपीच्या छावणीत जवानांमध्ये आपापसात वाद झाला होता. या वादानंतर एका संपत्प जवानाने आपल्या सर्व्हिस गनमधून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात पाच जवानांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : Chandrayaan 2 : इस्रोला दोन दिवसांपूर्वीच सापडला होता विक्रम लँडर : के. सिवन

गोळीबारानंतर त्या जवानाने स्वतःलाही गोळी झाडून घेतली त्यात त्याचाही मृत्यू झाला. या घटनेत आणख दोघे जवाना जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात हालविण्यात आलंय. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये बंगालमधील तीन, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि केरळमधील एका जवानाचा समावेश आहे.

हेही वाचा : पी. चिदंबरम यांना जामीन देताना सुप्रीम कोर्टाच्या पाच अटी!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITBP jawan shoots dead 5 colleagues in Chhattisgarh