Chandrayaan 2 : इस्रोला दोन दिवसांपूर्वीच सापडला होता विक्रम लँडर : के. सिवन

वृत्तसंस्था
Wednesday, 4 December 2019

इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी नासाचा दावा फेटाळून लावला आहे. नासाच्या आधी 2 दिवस विक्रमचे ठिकाण व लँडरचे अवशेष इस्रोला सापडले असल्याचे सिवन यांनी सांगितले. 

बंगळूर : अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने 'चांद्रयान 2'चा विक्रम लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी पडले ते स्थान व त्याचे तुकडे सापडल्याचा दावा केला होता. मात्र आज इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी नासाचा हा दावा फेटाळून लावला आहे. नासाच्या आधी 2 दिवस विक्रमचे ठिकाण व लँडरचे अवशेष इस्रोला सापडले असल्याचे सिवन यांनी सांगितले. 

तिचं नाव पॉर्न साईटवर सर्च केलं गेलं तब्बल 80 लाख वेळा

काल नासाने विक्रम लँडर सापडले असल्याचा दावा केला, त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितले की, 'इस्रोच्या ऑर्बिटरनेच विक्रम लँडरचा शोध घेतला. याबाबतची माहिती इस्रोच्या वेबसाईटवर दिली आहे. 3 डिसेंबरला टाकलेली ही माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघू शकता.' त्यांच्या या दाव्यामुळे नासाने केलेला दावा कितपत खरा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Chandrayaan 2 : विक्रम लँडरच्या माहितीकडे इस्रोनं केलं दुर्लक्ष?

नासाने काल आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती देत आमच्या ऑर्बिटरने विक्रमचे अवशेष सापडल्याची माहिती दिली. यानंतर चेन्नईतील शण्मुग सुब्रमनियम या इंजिनिअरने विक्रम लँडर त्या ठिकाणी असल्याची माहिती इस्रो व नासाला दिली होती. पण नासाने याची दखल घेऊन पुढील संशोझन केले व त्याचा ठावठिकाणा शोधला. मात्र इस्रो प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे त्यांन दोन दिवसांपूर्वीच याचा शोध लागला होता.    

Chandrayaan 2 : मला विक्रम लॅंडर सापडलाय; चेन्नईच्या इंजिनिअरने केले नासाला जागे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISRO chief K Sivan says they found Vikram Lander 2 days ago