
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. काँग्रेससह विरोधी पक्षांकडून धनखड यांच्या अचानक राजीनाम्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर भाजप खासदार रवी किशन यांनी विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप केलाय. कोण कधी आजारी पडेल कुणाला माहिती. त्यांनी त्यांच्या राजीनाम्यात आरोग्याचं कारण सांगितलंय तर त्यावर विश्वास ठेवायला हवा. एखाद्याच्या आरोग्याचा मुद्दा राजकारणाचा विषय कसा होऊ शकतो असा प्रश्नही रवी किशन यांनी व्यक्त केला.