esakal | विरुष्कानंतर आता झहीर-सागरिकाकडे 'गुड न्यूज'
sakal

बोलून बातमी शोधा

JAHEER KHAN AND SAGRIKA GHATAKE

भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटके यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता.

विरुष्कानंतर आता झहीर-सागरिकाकडे 'गुड न्यूज'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटके यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता. आता या दोघांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार असल्याची माहिती जहीरच्या जवळच्या मित्रांनी पुणे मिररला दिली आहे. सध्या जहीर आणि सागरिका दोघेही UAEमध्ये आहेत. झहीर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) एक महत्वाचा भाग आहे.

काही दिवसांपुर्वीच झहीरने त्याचा वाढदिवस मुंबई इंडियन्सचे त्याचे सहकारी आणि पत्नी सागरिकासोबत UAEमध्ये साजरा केला होता. मुंबई इंडियन्स संघाने त्याबद्दलचा व्हिडिओही संघाच्या सोशल मिडीयाच्या अकाउंटवरून शेअर केला होता. त्यामधे झहीर खान केक कापताना दिसला होता. जहीरच्या वाढदिवसादिवशी त्याने सागरिकासोबतचे फोटो शेअर केले होते.  

हेही वाचा- काँग्रेसने खुशबू सुंदर यांना प्रवक्ते पदावरुन हटवले, भाजपत सहभागी होण्याची शक्यता

क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटकेने 2017ला कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर या जोडप्याने 27 नोव्हेंबर मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मोठी रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती. त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींनी हजेरी लावली होती. 
 
यापुर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनीही त्यांच्या घरी तिसरा व्यक्ती येणार असल्याची गोड बातमी दिली आहे. ही माहिती त्यांनी सोशल मिडीयावरून दिली होती. सध्या अनुष्का शर्माही  दुबईत आहे. विराट कोहली सध्या रॉयल चॅलेंजर बॅंगलोरचा कप्तान आहे.

धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या युवकास गुजरातमधून अटक

भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला होता तेंव्हा झहीर भारतीय टीमचा सदस्य होता. भारताकडून सर्वाधिक विकेट घेत या स्पर्धेत जहीरने चांगली कामगिरी केली होती.